कंपनी सुरु करून आमचे संसार वाचावा !

कोकणात रत्नागिरी व दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनी (Bharati Shipyard) वाचावी म्हणून रोजी रोटी गमावलेल्या कर्मचाऱ्यांचे कंपनी पुन्हा सुरु करण्यासाठी आंदोलन केले असे वृत्त प्रहार कोकण वृत्तसंस्थेने दिले आहे.

आम्हाला आमचा रोजगार परत दया अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. आमची कंपनीत भंगारात विकू नका तर पुन्हा सुरु करा अशी मागणी यावेळी कामगारांकडुन करण्यात आली.

कंपनी पुन्हा सुरु करा व आम्हाला बेरोजगारीच्या संकटातून वाचवा अशी प्रतिक्रिया कर्मचारी प्रतिनिधी श्याम दाभोळकर यांनी दिली. २०१४ पासून कंपनीला उतरती कळा लागली, त्यामुळे हा मोठा जहाज बांधणी प्रकल्प सध्या बंद आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेला या प्रकल्पावर आता सध्या एडलवाईस कंपनीने आमची कंपनी भंगाराच्या भावात विकण्याचा डाव असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

ही कंपनी सध्या सेबीकडून एडलवाईसच्या ताब्यात आहे. एडलवाइसला न्यायालयाने प्रकल्प विकण्याची परवानगी न देता सुरु करण्याची परवानगी दयावी अशी मागणी यावेळी भारतीय कामगार सेना स्थानिक युनियन अध्यक्ष उल्हास तोडणकर व पदाधिकारी यानी केली आहे.यावेळी उपाध्यक्ष चेतन रामाणे, सेक्रेटरी श्याम दाभोळकर,सदस्य- शैलेश मयेकर. सूर्यकांत उसगावकर,संतोष आदवडे.,अमोल तवसाळकर,दिनेश आङवीलक स्थानिक कामगार नितीन तोडणकर , सुधाकर धोपावकर, विनोद आरेकर ,एकनाथ पवार , राम काटविलकर, समीर दर्वेश आदी असंख्य कामगार यावेळी शासनाचे कोरोना नियम पाळुन या आंदोलनात सहभागी झाले होते. 

केंद्र व राज्य शासनाने भारती शिपयार्ड कंपनी सुरू करून आमच्या चुली पटवाव्यात,यापूर्वी काहींनी आत्महत्या केल्या आहेत. अनेकांनी घरातील वस्तु, सोने गहाण ठेवले असुन काढलेली बँकांची कर्ज कशी फेडायची संसार कसे चालवायचे? असा निकराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कंपनीची एकंदरीत ६ यार्ड कार्यरत असून त्यातील ३ यार्ड महाराष्ट्र राज्यामध्ये ( रत्नागिरी, दाभोळ, मुंबई ) आहेत, त्यामुळे कामगांरानी पुन्हा हा प्रकल्प भारती शिपयार्ड च्या ताब्यात देऊन चालवण्यासाठी दिल्यास आमचे रोजगार वाचतील व कायमस्वरूपी आम्हाला येथे संधी उपलब्ध होईल या सगळ्याचा विचार करुन केंद्र व राज्य शासनाने यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कामगार सेना प्रतिनिधी शैलेश मयेकर यांनी पत्रकारांजवळ बोलताना केली आहे.