जिल्हा कामगार कार्यालय समोर अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे उपोषण दोन दिवसांकरिता तात्पुरते स्थगित
अहमदनगर : कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात मध्ये शासनाने कामगारांना कामावरून कमी करू नये व कामगारांचे पगार देण्याच्या सूचना केल्या होत्या,परंतु अहमदनगर एमआयडीसीमधील क्लासिक व्हील युनिट २ मधील २५ कामगारांना लाॅकडाऊन मध्ये कामावरून कमी केले तसेच वेतन देण्यात आले नाही व शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून पगार न देता कामावरून काढून टाकले त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेने वेळोवेळी कंपनी प्रशासक व कामगार आयुक्तांकडे पाठपुरवठा केला होता,परंतु कंपनीने कामगार कायद्याची पायमल्ली करत कामगारांवर अन्याय केला जात आहे. कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले तरी कामगारांना त्वरित कंपनीमध्ये कामावर हजर करून घ्या असे संघटनेचे म्हणणे होते.
क्लासिक व्हील युनिट २ मधील कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे कंपनीने द्यावे व त्वरित कामावर हजर करून घ्यावे या मागणीसाठी करण्यासाठी जिल्हा कामगार कार्यालय समोर अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे वतीने आमरण उपोषण करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे,दत्ता तापकिरे,किरण दाभाडे,पै.सुनील कदम,किशोर पालवे,भानुदास डोळस,विश्वास पंडित, शेखर भिंगारे,सुदर्शन प्रधान,स्वप्नील साळवे,राजेंद्र दरंदले,शैलेश कांडेकर आदी सह कामगार यावेळी उपस्थित होते.
सद्यपरिस्थिती :
दि.१४ जून २०२१ रोजी कामगार कार्यालय येथे झालेल्या मिटिंग मध्ये व्यवस्थापन यांच्या वतीने २ दिवसामध्ये कामगारांच्या प्रश्नावरती निर्णय घेतला जाईल असे सांगितल्यामुळे कामगार संघटनेने उपोषण स्थगित केले. निर्णय दोन दिवसामध्ये आला नाही तर कंपनी गेट वरती सर्व कामगार कुटुंबियांन सोबत उपोषण करतील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.