घरेलु महिला कामगारांच्या मागण्यांबाबत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना प्रतिनिधी यांनी घेतली भेट

कोल्हापूर : घरेलु महिला कामगारांच्या (Domestic Workers) मागण्यांबाबत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र असंघटित कामगार  संघटना (Maharashtra Asanghatit Kamgar Sanghatana (MAKS) ) प्रतिनिधी यांनी घेतली भेट घेऊन निवेदन दिले.

महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळाकडून शासकीय नोंदणीकृत घरेलु महिला कामगारांना मोबाईल वर लिंक पाठविली जात असून या महिला कामगारांना माहिती अद्यावत करण्याकरता मोबाईल लिंकचा वापर करण्यास सांगितले आहे त्यानुसार वर्ष १९६० ते २००३ या कालावधीत ज्यांचे जन्म वर्ष आहे त्या घरेलु महिला कामगारांना हा ऑनलाईन फॉर्म भरता येणार असून फॉर्म भरताना शिधा पत्रिका क्रमांक १२ अंकी नमूद करण्यास सांगितले आहे. यामुळे बहुसंख्य नोंदीत घरेलु महिला कामगार शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहणार आहेत अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

निवेदन मधील मुद्दे :

  • १) ६० वर्ष पूर्ण झालेल्या घरेलु कामगार महिला घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्या मुळे अजूनही दोन, तीन घरी काम करून उदर निर्वाह करतात, कारण त्यांना काम केल्या शिवाय पर्याय नाही या करिता वयाची मर्यादा काढून कोरोना महामारी बंध कालावधी मधील रु.१५००/-  त्यांना ही मिळणे आवश्यक आहे.

  • २) तसेच वय झाल्या मुळे दर महा मिळणारे उत्पन्न अल्प असल्याने या महागाईच्या काळात त्यांना दोन वेळच जेवण तरी व्यवस्थित मिळण्याकरिता दरमहा रु ३००० पेन्शन मिळावी.

  • ३) २०११ ते आज पर्यंत नोंदणी केलेल्या व काम करीत असलेल्या सर्व घरेलु कामगार महिलांना कोरोना महामारीतील बंद कालावधी मधील रु १५००/- मदत मिळावी

तसेच घरेलु कामगार कल्याण मंडळाकडे नवीन नोंदणी करताना काही मुद्द्यांचा विचार करावा लागेल :

  • १) कोरोना महामारीचे संकट अजुन पूर्णतः संपलेले नाही या करीता नोंदणी कार्यालयाच्या ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

  • २) शासकीय नोंदणी विभाग, तालुका,जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावी म्हणजे घरेलु महिला कामगारांना सोईचे होईल व गर्दी होणार नाही.

  • ३) नोंदणी करण्यासाठी कामगार कार्यालयात आवश्यक असा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात यावा.

  • ४) शासकीय नोंदणी करताना सर्वांना दिसेल अशा ठिकाणी नोटीस बोर्ड लावून त्यावर नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.

वरील मागण्यांचे निवेदन मा.कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले,या वेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शरद पंडित, सामाजिक कार्यकर्ते अरुण व्हरांबळे ,विनोद परदेशी उपस्थित होते. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी संघटना प्रतिनिधीच्या प्रत्यक्ष भेटीत घरेलु महिला कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी दिली.