राईट टाईट फास्टनर प्रा लिमि (Right Tight Fastners Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश चिटणीस अंकुश पवार व प्रदेश कार्यकारणी सदस्य संदेश जगताप यांच्या नेतृत्वामध्ये राईट टाईट फास्टनर (Right Tight Fastners Pvt Ltd)  माळेगांव एम.आय.डी. सी. सिन्नर, नाशिकच्या कामगारांच्या युनियनचा पहिला पगारवाढीचा करार करण्यात आला. 

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे : 

  • सदर करार तीन वर्षकरिता (१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३)

  • तीन वर्षांकरिता रु ७,५००/- रुपये (सात हजार पाचशे रुपये) वेतनवाढ 

  • १३४ कामगारांना कायम करण्यात आले. 

  • दर सहा महिन्यांनी मिळणारा विशेष भत्ता (special allowance) कामगारांना लागू करण्यात आला.

  • जुन्या २१ कामगारांना नोकरी वरून कमी करण्यात आले होते त्यांना सुद्धा कामावर पुन्हा घेण्यात आले.

या प्रसंगी कंपनी व्यवस्थापन वतीने कंपनी संचालक बलबीर छाब्रा, सीईओ श्रीधर वासुदेवन, प्लेट हेड पंकज दुबे, एचआर मीनल बोरस्ते, समाधान बोडके संघटनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना युनिट प्रतिनिधी बिपीन निंबाळकर, आकाश बुचडे, शेखर कडभाने, योगेश म्हस्के, सचिन उगले, कमलेश घेगडमल आदि युनिट सदस्य / पदाधिकारी उपस्थित होते.

या पगारवाढीबद्दल राईट टाईट फास्टनर माळेगांव एम.आय.डी. सी. सिन्नर, नाशिक युनियनच्या सर्व कामगारांनी व कामगार कमिटी सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे आणि प्रदेश चिटणीस मा. अंकुश पवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. संदेश जगताप व सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासुन आभार मानले. 

अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा