अ‍ॅपेक्स एशिया पॅसिफिक प्रा.लिमि. येथे भारतीय कामगार सेना नामफलक अनावरण

माळेगाव , सिन्नर एम.आय.डि.सी.तील अ‍ॅपेक्स एशिया पॅसिफिक प्रा.लिमि. (Apex Asia Pacific Private Limited) येथील कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सहचिटणीस श्री उत्तम खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सभासदत्व स्वीकारले असून शुक्रवार दिनांक ११ जुन २१ रोजी कंपनीच्या गेटवर नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.विजय आप्पा करंजकर यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी सिन्नर विधानसभा माजी आमदार श्री.राजाभाऊ वाजे, उपजिल्हा प्रमुख श्री.जगन आगळे , दिपक खुळे ,भारतीय कामगार सेनेचे नंदू गायकवाड , संजय जाधव , उपस्थित होते.

यावेळी कामगारांना संबोधित करताना श्री.विजय करंजकर यांनी भारतीय कामगार सेना कामगार हित जोपासतानाच उद्योग ही  जगाला पाहिजे यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले.यावेळी कामगार प्रतिनिधी मनोज राठोड , अभिजित पाटील,राहुल आहिरे,रंगराव गुरगुडे,राजेंद्र टाक,नामदेव धादवडयांस कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.