सोमेश्वर नगर : निरा,बारामती येथील ज्युबिलंट इनग्रेव्हिया लिमिटेड (Jubilant Ingrevia Limited) कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला. कामगारांची एकजूट, कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कोरोना काळामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे:
- सदर करार तीन वर्षकरिता (१ जुलै २०२० ते ३० जून २०२३)
- तीन वर्षांकरिता रु १६,०००/- रुपये (सोळा हजार रुपये) वेतनवाढ
- कामगार मृत्यूनंतर १८ लाख विमा
- १ जुलै २०२० पासून करारातील फरक कामगारांना देण्यात येणार
यावेळी संघटनेच्या वतीने करारावर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, उपाध्यक्ष सुरेश कोरडे, सचिव सुनील दत्त देशमुख, खजिनदार नंदकुमार निगडे यांनी व व्यवस्थापनाच्या वतीने उपाध्यक्ष सतीश भट, राजेंद्र जाधव, मुकेश सिंग, एच आर दिपक सोनटक्के, सूर्यकांत पाटील, श्रीकांत अरावटू यांनी करारावर सह्या केल्या करारासाठी अशोक वर्मा आणि गौतम यांचे सहकार्य लाभले.
अशी भरघोस वाढ करणारी ही पश्चिम महाराष्ट्रातील केमिकल उद्योगातील पहिलीच कंपनी ठरली आहे. कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून कंपनी व्यवस्थापन आणि संघटनेमध्ये सलोख्याचे वातावरण असून संघटनेने व्यवस्थापनाचे आभार मानले.
अन्य कंपनीमधील झालेले वेतनकरार पाहण्यासाठी - क्लिक करा