युनायटेड टेक्नॉमेक इंजिनिर्स प्रा लि (United Technomech Engineers Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे देशभर औद्योगिक व व्यापार विषयक मंदीचे वातावरण या पार्श्वभूमीवर कामगारांची एकजूट व कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे युनायटेड टेक्नॉमेक इंजिनिर्स प्रा.लि. (United Technomech Engineers Pvt Ltd) भोसरी व वसई व्यवस्थापन आणि  राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन वेतनवाढ करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे: 

  • सदर करार तीन वर्षकरिता (१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२४) 

  • तीन वर्षांकरिता रु १०,०००/- रुपये दहा हजार वेतनवाढ 

  • कर्मचाऱ्यांना विमा योजना

  • वार्षिक शारीरिक आरोग्याची तपासणी, वर्षाला २ गणवेश व शूज

  • दरवर्षी १५० कि. मी. कौटुंबिक सहल, कामगारांचे मुलांना उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती,तसेच विविध कामगार कल्याणकारी योजना राबविण्यात येणार

  • या पूर्वीच्या करारातील फायदे व कामाची वेळ जशाचे तसे राहणार

  • कामाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच राहणार असून, भविष्यात नवीन तंत्रज्ञान प्रमाणे उत्पादन काढावयाचे झाल्यास कामगार पूर्ण सहकार्य करणार

करार वेळी कंपनी व्यवस्थापन वतीने संचालक चेअरमन श्री प्रकाश मोडक व श्री शरद जोशी यांनी तर कामगारांचे वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष श्री यशवंतभाऊ भोसले युनिट कामगार प्रतिनिधी दिलीप चिखले, राजेश शाह, कमलेश यादव, सचिन काळे, प्रकाश पाटील, परशुराम पाटील, संदीप मुसळे, शैलेश चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.

महाराष्ट्राचे कामगार नेते श्री यशवंतभाऊ भोसले यांनी कामगारांची महत्वपूर्ण बाजू मांडून करोना काळातही भरगोस वेतनवाढ मिळवून दिल्याबद्दल सर्व कामगार बांधवांच्या वतीने (दि.९ जून) रोजी भोसरी, पुणे येथील कंपनीमध्ये त्याचा सत्कार केला या वेळी कंपनी व्यवस्थापक श्री. गजानन निमकरडे यांनी सर्व कामगारांचे अभिनंदन केले यशवंतभाऊंचे स्वागत केले आभार मानले, या पुढे देखील कंपनीच्या प्रगतीकरिता एक होऊन काम करावे असे त्यांनी आवाहन केले. या वेळी पेढे वाटून, फटाके फोडून कामगारांनी आनंद साजरा केला.