श्रमिक एकता महासंघाचे मदतीचे पत्रकाद्वारे संलग्न संघटनांना आवाहन
चाकण येथील भारत फोर्ज कंपनीच्या व्यवस्थापनाने तेथील एकूण १६६ कामगारांना कोरोना महामारी नैसर्गिक आपत्ती असल्याचे जाहीर करून १८ ऑगस्ट २०२० पासून ले ऑफ दिला आहे. तसेच या कामगारांची पगार वाढ १ एप्रिल २०१८ पासून ही रोखली असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कोरोना महामारी मध्ये या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना श्रमिक एकता महासंघाचे संलग्न असलेल्या संघटनांनी मदत करावी असे आव्हान महासंघाने केले आहे.
इतर कंपनीतील कामगारांच्या पगाराच्या तुलनेत भारत फोर्ज चाकण कंपनीतील कामगारांचे पगार फारच कमी आहेत. त्यामध्ये लेऑफ च्या काळात त्यांना त्यांचा मूळ पगार व महागाई भत्ता याच्या ५० टक्केच पगार मिळत असल्याने तुटपुंज्या पगारात घर खर्च भागविणे कठीण झाले आहे. घराचे कर्ज व इतर कर्जाचे हप्ते थकले असल्याने कामगार चिंताग्रस्त आहेत जीवन जगत आहेत.
सध्या हे प्रकरण औद्योगिक न्यायालयात न्यायप्रविष्ट असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर प्रकरणी तीन महिन्याच्या मुदतीत अंतिम आदेश होणे अपेक्षित आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निकाल लांबणीवर पडला आहे. तुटपुंज्या रक्कमेच्या मोबदल्यात कामगारांनी सेवानिवृत्ती स्वीकारण्यासाठी व्यवस्थापन कामगारांची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.
श्रमिक एकता महासंघाशी संलग्न संघटनांनी या कामगारांना आर्थिक मदत करावी याकरिता चेक द्वारे श्रमिक एकता महासंघाचे खजिनदार यांच्याकडे मदत जमा करण्यात करण्याचे आवाहन श्रमिक एकता महासंघ यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
संबंधित पोस्ट :
औद्योगिक न्यायालयाने भारत फोर्ज ले-ऑफ बाबत तीन महिन्यात निकाल द्यावा - उच्च न्यायालय