संघटना स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण अभियान

महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचा २३ जुलै रोजी वर्धापन दिन असून त्यानिमित्त सामाजिक भान ठेऊन १ मे २०२१ महाराष्ट्र दिन ,कामगार दिनापासून पासून २३ जुलै २०२१ संघटनेच्या वर्धापन दिनापर्यंत वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे त्याची सुरुवात पुणे व औरंगाबाद येथून "वृक्षारोपण" करून करण्यात आली अशी माहिती  संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी दिली आहे

संघटनेच्या वर्धापन दिनापर्यंत वृक्षारोपण अभियान संपूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे. संघटनेच्या ग्रामीण भागातील( गावातील ) सभासदांनी आपल्या शेतात, घरां जवळील मोकळ्या जागेत,शहरातली सभासदांनी उपलब्ध असणाऱ्या जागेत किंवा कुंडीमध्ये तुळशीचे किंवा आरोग्यास उपयुक्त वनस्पतीचे रोप लावावे असे आवाहन संघटने मार्फत करण्यात आले आहे.

 कोरोना महामारीच्या काळात आपण सर्व जण टीव्ही, वर्तमान पत्रामध्ये पहात असतो की कोरोना झालेल्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता मोठ्याप्रमाणावर आहे, परंतु तो मिळत नाही, कमी पडतोय,त्या साठी कृत्रिम प्राणवायू (ऑक्सिजन) निर्मिती करावी लागते आहे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन फुकट देतात या करिता २३ जुलै हा संघटनेचा वर्धापनदिन वृक्षारोपण करून आणि त्याचे पुढील काळात संगोपन करन्याची शपथ घेवून साजरा करावयाचा आहे. याची सुरुवात पुणे येथून प्रदेश उपाध्यक्ष मिना पंडित,स्नेहा मोरे,व औरंगाबाद येथे प्रदेश अध्यक्ष गणेश भोसले यांनी केली अशी माहिती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी दिली आहे तसेच यावेळी वृक्षारोपण अभियान राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सर्व सभासद बंधू भगिनींना करण्यात आले आहे.