कोरोना महामारी व सध्या सुरु असलेल्या लॉक डाउनच्या परिस्थिती मध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे असे असताना संपूर्ण राज्यामध्ये मोबाईल नेटवर्कची सेवापुरवणाऱ्या वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यातील सर्व कामगार स्वतःची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवाची पर्वा न करता घरा बाहेर पडून मोबाईल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम अहोरात्र करत आहेत. त्यामुळेच मोबाईल नेटवर्कची सेवा अखंडीतपणे चालु राहत आहे.
परंतु ही सेवा पुरवण्यासाठी काम करत असताना कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामगारांच्यान्याय-हक्कां साठी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एप्लॉईज असोसिएशन संघटनेच्या वतीने आयडीया, व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जिओ इ. मोबाईल कंपन्यांच्या मोबाईल टॉवरची सुरक्षा व दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या इंडस टॉवर टेलिकॉम इन्फ्रास्टकचर प्रा लि., ATC
टेलिकॉम इन्फ्रास्टकचर प्रा.लि., टॉवर व्हीजन टेलिकॉम इन्फ्रास्टकचर प्रा.लि., रिलायन्स जिओ टेलिकॉम इन्फ्रास्टकचर प्रा.लि. इतर कंपन्याकडे कामगारांच्या मागण्याबाबत संघटनेने पाठपुरावा केलेला आहे. याबाबत पुढील मागण्या असोसिएशन करत असून राज्य शासनाला देखील या प्रमाणे निवेदन दिले आहे.
विविध मागण्या -
१) कामगारांना मोबाईल टेलिकॉम इन्फ्रास्टकचर कंपन्यांनी मेडीक्लेम इन्सुरन्स, अपघात विमा कवर दयावे .
२) कामगारांना कोरोना आजारा पासुन स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षा साधनांचा कंपन्यांनी पुरवठा करावा .
३) नोकरी करत असताना कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या कामगारांना सध्याच्या परस्थिती मध्ये सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यावा लागत आहे.त्यांच्या खाजगी हॉस्पिटल मधील सर्व खर्चाची जबाबदारी कंपन्यांनी उचलावी.
४) नोकरी करत असताना कोरोना आजारामुळे मुत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबांना कंपनीने नुकसानभरपाई द्यावी .
५) मोबाईल टॉवर ची सुरक्षा व दुरुस्तीसाठी सर्व कामगारांना २४ तास अलर्ट राहुन काम करावे लागत आहे. कंपन्यांनी त्यांना काम करण्याचे तास ठरवुन दयावे व इतर क्षेत्रातील कामगारांप्रमाणे सर्व कायदेशीर सुट्या दयाव्यात.
६) वाढलेल्या महागाईमुळे कामगारांना सध्या मिळत असणाऱ्या तुटपुंज्या पगारामध्ये मोबाईल टॉवरच्या साईटवर जाऊन काम करणे परवडत नाही . कंपन्यांनी त्यांना इतर अत्यावश्यक क्षेत्रामध्ये कामकरणाऱ्या कामगारा इतकी पगार वाढ दयावी.
कंपन्या कामगारांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करताना दिसत नाही.उलट कामगारां कडून जबरदस्ती व दडपशाहीच्या मार्गाने कंपन्यांचे व्यवस्थापण काम करून घेत आहे.
त्यामुळे या कंपन्यांवर कामगार प्रशासन व राज्य सरकारची कोणत्याही प्रकारची भिती किंवा अंकुश राहीलेला नाही, असे दिसत आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये कामगारांनी काम करणे थांबवले तर मोबाईल नेटवर्क वर चालु असणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा बंद होऊन त्यावर अवलंबुन असणाऱ्या यंत्रणांचा कारभार ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही.
मोबाईल नेटवर्कची सेवा सुरळीत चालण्यासाठी टेलिकॉम इन्फ्रास्टकचर कंपन्यांनी संघटनेशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात,असे आदेश राज्य सरकारने कंपन्यांना दयावेत त्याच प्रमाणे मोबाईल नेटवर्कची सेवा पुरवणारे सर्व कामगार जिवावर उदार होउन काम करत आहेत. याकारणास्तव राज्य सरकारच्या वतीने कोरोना योद्धा म्हणुन त्यांचा सन्मान करावा.
कोरोना काळामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबाना आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच शासकीय अधिकारी, कामगार/कर्मचारी यांचे प्रमाणे राष्ट्रीयकृत बँके मार्फत विमा संरक्षण देण्यासाठी मोबाईल नेटवर्कची सेवा पुरवणाऱ्या कामगारांचा सरकारने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेकनिकल एप्लॉईज असोसिएशन संघटनेकडुन करण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी दिली.