वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी नोंदवला निषेध

कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा - महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्या गंभीर असून हे कामगार आपला जीव धोक्यात घालून जनतेला वीज सेवा देत आहेत ही सेवा देताना त्यांना कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नाहीत त्यांची काळजी घेतली जात नाही. बिन पगारी फुल अधिकारी प्रमाणे या कामगारांवर फक्त जबाबदाऱ्यां दिल्या जातात. कोरोना काळात  मागील वर्षभरात राज्यातील जनतेला सेवा देतांना सुमारे ४१  वीज कंत्राटी कामगारांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने कोणतीही आर्थिक मदत केली नाही.

वीज कंपनीतील हजारो रिक्त पदांच्या जागेवर कंत्राटदारांच्या मार्फत या कामगारांची नियुक्ती केली जाते. नवीन आलेले कंत्राटदार जुन्या अनुभवी कामगारांना कमी करतात व नवीन कामगार भरतात. रोजगार देण्यासाठी २० ते ४० हजार रुपयांची मागणी केली जाते. काही ठिकाणी पगारातूनच दर महिन्याला 2 ते 7 हजार रुपये इतकी अनधिकृतपणे कपात केली जाते. काही ठिकाणी नामधारी बँक खाती काढली जाऊन कामगारांचे चेक आगाऊ घेतले जातात, बँकेच्या विड्रॉल स्लिप वर आधीच सह्या घेऊन विविध बॉण्ड पेपर वर देखील सह्या घेऊन ठेवले जाते. 

या सर्व गोरख धंद्यातून कामगारांची सुटका व्हावी त्यांचे आर्थिक मानसिक सामाजिक स्वास्थ्य नीट राहावे यासाठी संघटना प्रयत्नशील असून जून २०२० पासून संघटना आंदोलने करत असून मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, प्रधान सचिव ऊर्जा, वीज कंपनी प्रशासन, कामगार आयुक्त,  इत्यादि ठिकाणी अनेक पत्रव्यवहार करून देखील या सर्वांनी वर्षभर कामगारांकडे दुर्लक्ष केले.

  शासन, ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवार दिनांक ११ मे रोजी राज्यभरातील पालघर, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कल्याण, पनवेल,नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद ,नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशीम,यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील सुमारे ४००० कंत्राटी कामगारांनी काळ्या फिती लावून काल (११ एप्रिल २०२१) निषेध नोंदवला

शासनाच्या दुर्लक्षामुळे कामगारांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन या फ्रंट लाइन कामगारांच्या समस्या ताबडतोब सोडवाव्यात यासाठी शासनाने संघटनेसोबत मीटिंग घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवावेत ही संघटनेची रास्त अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष निलेश खरात, व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.