एन्काई व्हील्स इंडिया लिमि. (Enkei Wheels India Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : शिक्रापूर येथील एन्काई व्हील्स इंडिया लिमि. (Enkei Wheels India Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि एन्काई  कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढीचा करार दि.24/09/2025 रोजी शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे - 

करार कालावधी : सदर करार 3 वर्ष कालावधीसाठी लागू असेल (दि. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2028)

पगार वाढ : रु.22,000/- 
प्रथम वर्षासाठी - 55%, द्वितीय वर्षासाठी - 20%, तृतीय वर्षासाठी - 25%

फरक रक्कम : सर्व कामगारांना दि.01/04/2025 पासून च्या वाढीव रकमेचा फरक सप्टेंबर महिन्याच्या पगारात देण्यात येईल.

मेडिक्लेम पॉलीसी : कामगारांच्या कुटुंबासाठी 4,00,000/- रुपये मागीलप्रमाणे राहील. यामध्ये नव्याने बफर रक्कम रु.20 लाख ही पॉलिसी सुरू करण्यात आली.

मृत्यू साहाय्य योजना : एखाद्या कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचे प्रत्येकी 5000/- रु. कपात करून बाकीचे पैसे कंपनी टाकणार व  कायदेशीर वारसास रु.45,00,000/-(पंचेचाळीस लाख) रुपये मिळणार.

सुट्ट्या : PL मध्ये एक लिव्ह वाढवण्यात आली .
A) PL - 22, B) SL - 07, C) CL - 07
PL ही रजा सिंगल घेता येणार त्या साठी SL व CL संपण्याची आवश्यकता नसेल, तसेच लिव्ह मध्ये W/OFF आल्यास त्या ठिकाणी लिव्ह भरावी लागणार नाही. 

वाहतूक सुविधा : नवीन बस सुरू करण्यात येतील. तसेच कामगारांना येण्या जाण्यासाठी सोईस्कर म्हणून नवीन स्टॉप वाढवण्यात येतील.

दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस
अ) सन 2025:- रु.50,000/-
ब) सन 2026:-  रु.50,000/-
क) सन 2027:- रु.50,000/- देण्यात येईल. 

मासिक हजेरी बक्षीस : ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून 1500/- ( एक हजार पाचशे ) रुपये देण्यात येईल.

पगाराची उचल : पगाराची उचल म्हणून महिन्यात 2 कामगारास 1,00,000/- (एक लाख) रु.इतकी रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याची परत फेड ही पुढील समान 10 महिन्यांत करण्याचे ठरले.

खेळ : दरवर्षी हॉलिडे च्या दिवशी क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येतील.त्या साठी लागणारा खर्च कंपनी करेल.

चहा : दुसऱ्या पाळीत रात्री 9:00 वा. चहा सुरू करण्यात आला.

गणवेश : दरवर्षी मिळणाऱ्या युनिफॉर्म सोबत प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑडिट च्या वेळी एक टी-शर्ट मिळणार .

रात्रपाळी भत्ता : प्रति दिन (80×6) = 480/- रुपये इतका करण्यात आला आहे.

सी.एन.सी.भत्ता : प्रति दिन (20×26) = 520/- इतका करण्यात आला आहे.

अवजड भत्ता : प्रति दिन (20×26) = 520/- इतका करण्यात आला आहे.

उष्णता भत्ता : प्रति दिन (50×26) = 1300/- इतका करण्यात आला आहे.

पेंटिंग भत्ता : प्रति दिन (20×26) = 520/- इतका करण्यात आला आहे.

जादा कामाचा पगार : साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कामावर आल्यास त्याचा दुप्पट पगार मिळणार व त्या सोबत 1 पगारी सुट्टी मिळणार.

अपघात विशेष सुट्टी : कामावर येताना जाताना अपघात झाल्यास 15 दिवसाची पगारी सुट्टी मिळणार तसेच त्या पेक्षा जास्त दिवसाची गरज पडल्यास योग्य शहानिशा करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन वाढीव सुट्या मिळणार.

सांत्वन रजा : पूर्वी मिळत असलेल्या सुट्या मध्ये 01 ने वाढ करून त्या 03 करण्यात आल्या.

रजा साठवणूक : अ) PL :- 85 ,ब) SL :-  15, क) CL : 00 एकूण : 100 दिवस.

दिवाळी गिफ्ट :-
सन 2025 :- रु.3000/- 
सन 2026 :- रु.3500/- 
सन 2027 :- रु.4000/-  या रकमेचे गिफ्ट देण्यात येईल.

संघटना कार्यालय : संघटनेला दैनंदिन कामकाजासाठी नवीन कार्यालय उपलब्ध करून देण्यात येईल.

कामगार कुटुंब संवाद : कामगार कुटुंबीयांना कंपनी पाहण्याची सुविधा 5s ऑडिट झाल्यानंतर व्यवस्थापनाची परवानगी घेऊन उपलब्ध करून देण्यात येईल.

सध्या सुरू असलेल्या कॅन्टीन, बस, मेडिक्लेम च्या रकमेच्या कपातीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही.

सध्या सुरू असलेल्या स्पेशल जेवणामध्ये अजून 2 ची वाढ होऊन ते 5 करण्यात आले.

सेवा बक्षीस :
A) 220 वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना 10,000/- रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. 
B) 25 वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना 12,000/- रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल.

     सदर करारावरती कंपनी व्यवस्थापन वतीने श्री.संदीप ओहोळ (व्हाइस प्रेसिडेंट), श्री.संतोष नाईक (एच.आर.हेड), श्री.संजय माथाडे ( मॅनेजर), श्री.विक्रम काकडे (मॅनेजर), श्री.नितीन बामणे (मॅनेजर) आणि युनियनच्या वतीने अअध्यक्ष श्री,अनिल हरगुडे , उपाध्यक्ष श्री संदीप खैरनार , सेक्रेटरी:- श्री. सारंग गायवळ, खजिनदार श्री. संतोष मेमाणे, सदस्य श्री.पांडुरंग खैरे, श्री.सचिन कोळपे, श्री.संभाजी घाडगे, श्री.अतुल जाधव, श्री.सतीश पाटील यांनी सह्या करून वेतनकरार संपन्न झाल्याचे जाहीर केले.