Steelcase Asia Pacific Holdings India Pvt.Ltd gave fifty thousand rupees to each worker and employee as Covid relief fund.
चाकण : कोरोना परिस्थितीमध्ये कंपनीतील कामगार व कर्मचारी यांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन म्हाळुंगे चाकण येथील Steelcase Asia Pacific Holdings India Pvt.Ltd. या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व दाखवत तेथील सर्व कामगार, कर्मचारी यांना कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा कोविड मदत निधी (Covid Relief Fund) म्हणून कामगारांच्या खात्यावरती जमा केला आहे.
त्याचबरोबर कामगारांच्या फॅमिली मध्ये जर कोणीही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर त्यांच्या साठी ऑक्सीजन सिलेंडर तसेच मेडिसिन उपलब्ध करून देणार आहे. यापद्धतीने कंपनीने सर्व कामगार, कर्मचारी यांची काळजी घेण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. अशी माहिती कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली.
कंपनीने सर्व कामगार,कर्मचारी यांना यापद्धतीने केलेली मदत बद्दल तेथील स्टीलकेस एशिया पॅसिफिक होल्डिंग्स इंडिया प्रा.लिमिटेड शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड.विजय पाळेकर तसेच युनिट प्रतिनिधी प्रकाश पटारे अध्यक्ष, विजय फिरके उपाध्यक्ष, श्रेणिक पाटील सेक्रेटरी, अमोल तांबे खजिनदार यांनी कंपनीचे आभार मानले.