कामगार व रोजगार राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी दि.१७ मार्च रोजी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली माहिती
औद्योगिक सुरक्षा आरोग्य आणि सेवाशर्ती संविदा (कोड) २०२० (The Occupational Safety, Health and Working Conditions (OSHW&C) Code, 2020) मध्ये कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या अटींसाठी तरतुदी आहेत ज्यात दररोज आणि साप्ताहिक कामकाजाचा कालावधी, रजा इत्यादींचा समावेश आहे.
दि. २९ सप्टेंबर २०२० रोजी औद्योगिक सुरक्षा आरोग्य आणि सेवाशर्ती संविदा (कोड) २०२० प्रकाशित केले गेले आहे आणि केंद्र सरकारने तारीख जाहीर केल्यानंतर तेव्हापासून कोड अंमलात येईल.
औद्योगिक सुरक्षा आरोग्य आणि सेवाशर्ती संविदा (कोड) २०२० आणि त्यानुसार तयार केलेल्या नियमांच्या मसुद्यानुसार कोणत्याही कामगारांना कोणत्याही आस्थापना किंवा आस्थापनांच्या वर्गवारीमध्ये एका दिवसात आठ तासांपेक्षा जास्त किंवा आठवड्यात अट्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
कामकाजाचा कालावधी वाढविण्यास या मंत्रालयाने सहमती दर्शवलेली नाही असे कामगार व रोजगार राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी दि.१७ मार्च रोजी राज्यसभेत लेखी उत्तरात माहिती दिली.