आळंदी : आळंदी-मरकळ रोड वरील वर्षा फोर्जिंग लिमिटेड या नामांकीत कंपनी मधील असंख्य कामगारांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे सभासदत्व स्विकारून दि.१८ मार्च रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी दिपक पाटील,दिनेश पाटील, संघटनेचे सचिव अमोल घोरपडे, शिरूर तालुका अध्यक्ष रेवणनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दत्तात्रय रोकडे, युनिट अध्यक्ष अतुल उंद्रे, उपाध्यक्ष प्रविण लोखंडे, सचिव अमोल वर्पे, खजिनदार सागर लोखंडे, सदस्य महेंद्र दळवी तसेच असंख्य कामगार उपस्थित होते.
कामगार वर्गावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही तसेच कामगारांना संघटने तर्फे न्याय मिळवुन देऊ असे यशवंत भोसले यांनी यावेळी सांगितले.