कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी पाठपुरावा करणार - डॉ.रघुनाथ कुचिक

शिर्डी : शिर्डी साई संस्थान मधील सर्व कंत्राटी कामगार यांना कायम करण्यात यावे तसेच साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ त्वरित नेमावे यासाठी आपण मुख्यमंत्री यांना भेटून कामगारांचा व विश्वस्त मंडळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिवसेना उपनेते व कामगार सेनेचे सरचिटणीस तसेच किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ कुचिक यांनी शिर्डी येथे भारतीय कामगार सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय उदघाटन करताना दिले.

   यावेळी शिवसेना ग्राहक संघाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिंनगर, शहर प्रमुख सचिन कोते, साई संस्थान एम्प्लॉयमेंट सोसायटीचे विठ्ठल पवार, किरण गोंदकर, शुभम दिघे, विश्वास जगताप, शिवाजीराजे चौधरी, महिंद्र कोटस्थाने, शिवाजी चौधरी, ज्ञानदेव पवार, सामाजिक कार्यकर्ते सतिश गंगवाल आदींसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

     शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झाला असून संस्थान मधील कामकाज हे कायम स्वरूपाचे असून याठिकाणी गेली अनेक वर्षपासून काम करत असलेल्या २७०० कंत्राटी कामगार यांना कायम करण्यात येणे गरजेचे आहे. यासाठी आपण प्रयत्न करू असे डॉ.रघुनाथ कुचिक यांनी सांगितले