नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या अधिवेशन अधिवेशनात पेन्शन सारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत खासदार माने यांनी गेली अनेक वर्ष संपूर्ण देशभर ईपीएस-९५ पेन्शन धारकांची चे आंदोलन सुरू आहेत त्याकडे केंद्र सरकारने लक्ष देणे गरजेचे असून या कामगारांना प्रति महिना ९,०००/- पेन्शन देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.
ईपीएस-९५ पेन्शन धारकांना पूर्वी प्रति महिना रु.१,०००/- मिळत होती ती नंतर वाढवून सद्यपरिस्थितीमध्ये प्रति महिना रु.३,०००/- पेन्शन मिळते त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, त्यांच्या औषधांचाही खर्च निघत नाही त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हालाखीचे जीवन पेन्शन धारक जगत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१९ मध्ये एका निर्णयात आदेश देताना पेन्शन म्हणून दिली जाणारी रक्कम ही अत्यंत कमी आहे त्याचबरोबर याबाबत खोशियारी समितीने दिलेल्या अहवाल याप्रमाणे या सर्व पेन्शन धारकांना प्रतिमहिना रु.९,०००/- पेन्शन करण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली.