बांधकाम कामगाराचा काम करत असताना मृत्यू

तुरुंबे ता.राधानगरी : येथे विहिरीचे बांधकाम करताना दशरथ ज्ञानेश्‍वर तोरस्कर या बांधकाम कामगाराचा पाय घसरून तोल जाऊन निधन झाले.

        ही घटना समजताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, कामगार आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली तसेच पाठपुरवठा करून पोलीस स्टेशन कडून पंचनामा केला. तसेच यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळणारे सर्व लाभ मृत कामगार कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

      यावेळी कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के, करवीर तालुका अध्यक्ष कृष्णात लोखंडे, उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, खुदबुद्दीन नाईकवडे, बाळू सुतार आदी उपस्थित होते.