मे.टॉवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल एल.एल.पी., इंदापूर येथे वेतनवाढ करार संपन्न

मे.टॉवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल एल.एल.पी. या इंदापूर एमआयडीसी कंपनी मधील राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या सभासद कामगारांचा त्रैवार्षिक करार संपन्न झाला. संस्थापकीय अध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या उपस्थितीत, अध्यक्ष तेजसदादा शिंदे, सरचिटणीस विठ्ठल गोळे यांच्यासह व्यवस्थापन प्रतिनिधी HR व्यवस्थापक संदीप पाटील, अजय शेळके, संग्राम जगताप तसेच कामगार प्रतिनिधी विक्रम अर्जुन, रत्नप्पा सातपुते, वैभव खेडेकर यांच्या करारावर सह्या करण्यात आल्या. 

    यामध्ये वार्षिक करार माहे १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत करता परस्पर संमतीने करण्यात आला.

तीन वर्षाकरता सभासद कामगारांना खालील प्रमाणे वाढ देण्यात आली.

प्रथम वर्षाकरता - रु. २,४७०/- वेतनवाढ 

द्वितीय वर्षाकरता - रु. १,५००/- ,  रु.२५०/- हजेरी भत्ता 

तृतीय वर्षाकरता - रु. १,५००/- ,  रु.२५०/- हजेरी भत्ता 

याव्यतिरिक्त कॅन्टीन भत्ता रु.८५०/-  

      एकूण रुपये ६,८२०/- निव्वळ वाढ व सीटीसी नुसार रु. १०,०००/- इतकी भरघोस वाढ देण्यात आली. तसेच कामगारांना आरोग्य विमा सुविधा तसेच कायद्यानुसार बोनस, जादा कामाचा मोबदला, गणवेश, बूट देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच बदली भत्ता प्रतिमहा रु. ३०००/- जेवण व नाष्टा सुविधा देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. 

      सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून करून कोरोना १९ कालावधी असतानाही संघटनेच्या व आमदार शशिकांत शिंदे, सरचिटणीस विठ्ठलराव गोळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.