वाशी,मुंबई : सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज कामगार संघटना शाखा क्रमांक २ च्या नामफलकाचे उद्धाटन प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल शिवजीराव खटकाळे भाऊ यांच्या शुभहस्ते दि.१९ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले.
यावेळी शिवाजीराव खटकाळे यांनी कामगारांना संबोधित करताना सांगितले कि, कंपनी व्यवस्थित चालली तरच कामगार व्यवस्थित राहू शकतो. प्रत्येक संघटनाही आपल्या कंपनीवर अवलंबून असते. सर्व कामगारांनी कंपनीने दिलेले काम प्रामाणिकपणे करणे, जर कंपनी प्रॉफिट मध्ये आली तर तुम्हाला वेतन लाभ जास्त प्रमाणात मिळू शकतो. कंपनी नवीन गुंतवणूक करत असेल तर कामगारांचे भविष्य उज्वल असेल. येणारे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे कंपनी मध्ये तयार होणारे उत्पादन उत्तम गुणवतेचे करून देणे कामगारांच्या हातात असते. या पद्धतीने कंपनीच्या कामगारांनी काम केले तर कंपनी १००% कामगारांचा हिताचाच निर्णय घेईल.
यावेळी श्रीरामपूर सनफ्रेश कामगार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पोटे, वाशी प्लांट संघटनेचे अध्यक्ष सागर गायकवाड, सरचिटणीस सुरज वाघमैतर, खजिनदार मिथुन गोळे, पंकज साकरीया, सदस्य विनश्री गायकवाड मॅडम तसेच पुणे जिल्हा कामगार सेल अध्यक्ष प्रविण बल्लाळ, IMD कामगार समन्वय संघटना वालचंदनगर चे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, रणगांवचे सरपंच राहुल रणमोडे, वाशी सनफ्रेश कंपनीचे प्लांट हेड नागेश्वर राव, HR व्यवस्थापकीय अधिकारी श्री प्रविण गांगुर्डे, व कामगार बंधू उपस्थित होते.