'इंटक' नवीन कामगार कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी 'रथयात्रा' काढणार

नवी दिल्ली : इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेसने (इंटक) नवीन केंद्रीय कामगार कायद्यांना कामगारविरोधी म्हणून घोषित केले आणि निषेध म्हणून ते देशभरात रथयात्रा काढणार असल्याचे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेस ने दिले.

इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस (INTUC) च्या नॅशनल वर्किंग कमिटीच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष के एन त्रिपाठी म्हणाले की कामगार कायद्यांच्या विरोधात देशव्यापी 'रथयात्रा' घेण्याचा प्रस्ताव आहे.

"असे अनेक मुद्दे आहेत ज्यात सरकारला बदल करावे लागतील. ज्याप्रमाणे कृषी कायदे केले. त्याचप्रमाणे कामगार-विरोधी कायदे देखील लागू करण्यात आले आहेत," असे इंटकने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

त्रिपाठी यांनी दावा केला की, केंद्र सरकारने कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून ४७ कामगार कायदे रद्द करून चार कामगार कोड आणले आहेत. यामुळे कामगारांच्या अधिकाराचे उल्लंघन होईल. तसेच यातून उद्योगपती कामगारांसाठी हुकूमशाही पद्धतीने वागतील.