पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना करिता कामगार कल्याण मंडळाचे ऑनलाईन अर्ज सुरु

ज्या कामगारांना LIN नंबर मिळाला आहे व ते त्याभागातील कामगार कल्याण मंडळ केंद्राचे सभासद झाले आहेत अशा कामगार व कामगार कुटुंबीयांकरिता पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजनेचे ऑन लाईन अर्ज भरण्या करिता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची वेबसाइट सुरु झालेली आहे.

     https://public.mlwb.in या संकेत स्थळवर जाऊन membership वरती क्लिक करून Application for schemes मध्ये पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजनेचा अर्ज भरता येईल. वेबसाईट ओपन झाल्यावर संबंधित कामगारांचा LIN नंबर हा यूजर नेम राहील व रजिस्टर मोबाइल नंबर पासवर्ड राहणार आहे. 

अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२१ आहे.

योजनेचे स्वरुप :

     कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. पालकाची वार्षिक उत्पन्न मर्या दा रु.५ लाखांच्या आत असावी. इयत्ता ११ वी पासून पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी सदर योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. यात तांत्रिक / वैद्यकीय / अभियांत्रिकी आदी व्यवसायिक अभ्यासक्रमांचा देखील समावेश आहे. ए.टी.के.टी. विद्यार्थ्यांनाही सदर योजनेचा लाभ दिला जातो. 

      सदर योजनेसाठी किमान टक्केवारीची अट नाही. अर्जदाराने पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेचा अर्ज क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या नावासह प्राचार्या कडून प्रमाणित करुन घ्यावा. प्राप्त अर्ज गुणवत्तेनुसार(मेरीट) व मंडळाच्याआर्थिक तरतूदनुसार मंजूर/ नामंजूरकेले जातील.

लाभाचे स्वरुप :

१. दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) चे शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांना रु.२५००/- पर्यंत अर्थसहाय्य.

२. बारावीनंतर अभियांत्रिकी पदवी (डिग्री) चे शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांना रु.२५००/- पर्यंत अर्थसहाय्य

३. इतर अभ्यासक्रमांसाठी रु.१५००/- पर्यंत अर्थसहाय्य 

आवश्यक कागदपत्रे :

( सूचना - संकेत तस्थळावर अपलोड करावयाची सर्व कागदपत्रे मूळ ( ओरिजनल ) असावीत . छायांकि त प्रती ( झेरॉक्स ) अपलोड करु नयेत . )

 प्राचार्यां नी प्रमाणित केलेला विहित नमून्यातील अर्ज.

 क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदीचे देयक.

 चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.

 विद्यार्थ्याचे आधार कार्ड.

 बँकेचा कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक (अकाऊंट नंबर व आय.एफ.एस.सी. नंबर नमूद असणे आवश्यक)

 महाराष्ट्र कामगार कल्याण निधी (MLWF) कपात दर्शवणारी नजीकच्या काळातील (जून किंवा डिसेंबरपैकी) वेतन पावती किंवा वेतन पावती नसल्यास कामगाराचा MLWF भरणा केल्याबाबतचा आस्थापनेचा दाखला. (कोणतेही एक)

 कंपनी बंद पडली असल्यास कंपनी बंद पडल्याबाबतचा सक्षम प्राधिकरणाचा दाखला किंवा कामगाराचा सेवेत असतांना मृत्यू झाला असल्यास मृत्युचा दाखला जोडावा. सदर दाखले ३ वर्षा पर्यंत वैध असून मंडळाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो. (लागू असल्यास)

 रेशनकार्ड / ईएसआयसी कार्ड (कोणतेही एक)

 अर्जदार दिव्यांग असल्यास सक्षम प्राधिकरणाचा दाखला जोडावा.

योजना विषयी अधिक माहिती साठी आपल्या भागातील कामगार कल्याण केंद्र येथे संपर्क करावा.