घरेलु व बांधकाम महिला कामगारांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना ही राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करीत आहे. तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवित आहे, सर्व धर्म समभाव राखण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, मकरसंक्रांती पासून रथसप्त्तमी पर्यंत पुणे शहर, जिल्ह्याच्या अनेक भागात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्याची सुरवात धनकवडी,पुणे भागात तीळगुळ वाटपाच्या कार्यक्रमापासून करण्यात आली. 

      यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मीना पंडीत, प्रदेश सेक्रेटरी सुवर्णा कोंढाळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष उषा जाधव,  संध्या आदावडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिता बढे, भोर तालुका अध्यक्ष गिता भिलारे या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती भागातील बहुसंख्येने महिला कामगार उपस्थित होत्या.