कोर्टाने दिले परत रुजू करून घेण्याचे आदेश - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा पुढाकार
चाकण : चाकण येथील JBM कंपनीतील बहुसंख्य कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासत्व स्वीकारले होते त्याचा राग मनात धरून कंपनी व्यवस्थापणाने कामगारांची कोणतेही कारण न देता महाराष्ट्राबाहेर अनधिकृत बदली केली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांनी वेळोवेळी पत्र पाठवून बदली रद्द करण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाला सांगितले होते. तरी कंपनी आडमूठपणाची भूमिका सोडत नाही. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष ऍड.रुपाली ठोंबरे पाटील ह्यांनी कोर्टामध्ये धाव घेऊन कोर्टाकडून बदली थांबवण्याचा आदेश आणला. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपचिटणीस तानाजी पिसे यांनी दिली. सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते.