कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने राजारामपुरी येथील जिल्हा कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष संजय पाटील होते.
यावेळी संजय पाटील म्हणाले, महानगरपालिका निवडणुका कामगार युनियन ठराविक जागांवर ताकदीने लढविणार असून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेण्यात आलेली होती. युनियनचे राज्याचे नेतृत्व नामदार सतेज पाटील यांनी करावे असे निवेदन त्यांना देण्यात आले होते.
कामगार युनियन आणि इतर कामगार संघटना कोल्हापूर शहरातील यांची मोट बांधून संपूर्ण ताकदीने महानगरपालिका निवडणुका काही प्रभागात लढविणार असून, किमान पाच जागा नेत्यांनी कामगार युनियनला द्याव्या. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महानगरपालिकेमध्ये कामगार प्रतिनिधी नगरसेवक म्हणून गेल्यास कामगारांचे जे शेकडो प्रश्न आ वासून उभे आहेत ते सोडवण्यास निश्चित मदत होणार आहे प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी कामगार किंवा कर्मचारी असतो त्यामुळे निवडणुकांमध्ये युनियन च्या उमेदवाराला निश्चित पणाने मोठ्या संख्येने मतदान होईल असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीस रियाज जैनापूर, योगेश हातलगे, बापू पवार, संग्राम जाधव,ओंकार हिरवे. अर्जुन भोसले, हुसेन हबीब, अनिल राठोड,अनिल कवाळे, परवेज सय्यद, अमित पाटील, सतीश मोटे, संजय बोधे आदींसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.