रांजणगाव MIDC मधील DongKwang Precision India Pvt. Ltd. कंपनी येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना नामफलक अनावरण

 

रांजणगाव : शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC मधील DongKwang Precision India Pvt. Ltd. कंपनी, या खाजगी उद्योगामधील कामगार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ह्या संघटनेचे अधिकृत सभासदत्व स्विकारले. 

        राजेश उज्जैनकर उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्या हस्ते या युनिट नामफलकाचे अनावरण करण्यात आले. सदर प्रसंगी राज्य चिटणीस दिनेश चव्हाण, उपचिटणीस यशवंत हाडगे , अशोक थिटे, कार्यकारणी सदस्य गणेश खंडारे, नाना लांडे, नवनाथ टेमगिरे,विशाल मराठे, युनिट अध्यक्ष अविनाश वाळुंज, उपाध्यक्ष दिपक गंगावणे, सचिव प्रशांत बेडभर, सुभाष राठोड, आशिष धुमाळ आणि कामगार सभासद उपस्थित होते.