महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारा कामगार यामध्ये संघटित कामगार व असंघटित कामगार सर्वांनाच इंग्रजी भाषा येते किंवा समजते असे नाही.
बहुसंख्य ठिकाणी याचा गैरफायदा काही कंपनी व्यवस्थापन घेताना दिसतात. कामगार विषयक कोणतेही पत्र किंवा करार, नियुक्ती पत्र तसेच अन्य कामगार विषयक बाबी यामध्ये इंग्रजी भाषा वापरली जाते. त्यामुळे बहुसंख्य कामगार याना परिपूर्ण पणे संबंधित कागदपत्र यांचा अर्थ समजण्यात अडचण निर्माण होते.
त्याचबरोबर कामगार आयुक्त, उपायुक्त कार्यालय येथे कामगार विषयक प्रकरण चालू असताना बहुसंख्य कंपनी व्यवस्थापन इंग्रजी भाषेचा वापर करून पत्र व्यवहार करतात. यामुळे संबंधित प्रकरणामधील कामगार यांना यासर्व कागदपत्र यांचे संपूर्ण अवलोकन होत नाही. यामुळे बऱ्याच कामगारांचे नुकसान होताना दिसते.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून कामगार विषयक सर्व कागदपत्रे व पत्रव्यवहार मराठीमध्ये केल्यास बहुसंख्य कामगारांचे होणारे नुकसान थांबविले जाईल. यावरती शासनाने विचार करणे गरजेचे आहे.