कंपनी कायमस्वरुपी कामगार,कर्मचार्‍यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकत नाहीत - केंद्र सरकार

 

        नवीन कामगार कायद्यांच्या आश्रयाने कोणतीही कंपनी कायमस्वरुपी कामगार,कर्मचार्‍यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकत नाहीत. यासह कंपनी कपातीने पीडित कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी सीएसआर फंडाचा एक विशेष निधी म्हणून वापर करू शकतात. 

       याबाबत कामगार मंत्रालय यांची नवीन नियमांबाबत लवकरच बैठक होणार असून सीएनबीसी चे प्रतिनिधी प्रकाश प्रियदर्शी यांनी अशी माहिती दिली कि, या बैठकीमध्ये सर्विस रूल्समध्ये लवकरच मोठे बदल केले जाऊ शकतात, कपातीने झालेल्या कर्मचार्‍यांना मदत करण्यासाठी विशेष निधीचे नियम बनविण्यात येतील व त्यांना री-स्किलिंग दिले जाईल. या बैठकीत कामगार संहिता नियम निश्चित केला जाऊ शकतो. त्याचबरोबर उद्योग, कर्मचारी संघटना आणि कामगार संघटनाही या बैठकीत भाग घेतील.