पुसाळकर सुरक्षा कॉम्पोनेन्ट कंपनी येथे भारतीय कामगार सेना नामफलक अनावरण

 

मुळशी : पिरंगुट ता.मुळशी येथील पुसाळकर सुरक्षा कॉम्पोनेन्ट प्रा.लि. या लढाऊ सुरक्षा सामग्री उत्पादन निर्मिती करणाऱ्या खाजगी उद्योगामधील बहुसंख्य कामगार यांनी भारतीय कामगार सेना शिवसेना ह्या संघटनेचे अधिकृत सभासदत्व स्विकारले. 

        डॉ.रघुनाथ कुचिक शिवसेना उपनेते, प्रदेश सरचिटणीस भारतीय कामगार सेना यांच्या हस्ते या यूनिट नामफलकाचे अनावरण करण्यात आले. सदर प्रसंगी पिरंगुट विभाग संघटक संदेश सुर्वे, धनंजय नागरे, यूनिट प्रमुख विनोद वावळे, सुनिल महादे, विजय चव्हान, रविंद्र इंदलकर, बापू जाधव, भारतीय कामगार सेना सह चिटणीस विश्वास जगताप, शुभम दिघे, मध्यवर्ती राज्य कार्यकारणी सदस्य वैभव घुले पाटिल, उमेश सालुंके, कमलेश कांबळे, राहुल गायकवाड, लकी रणदिवे, प्रफुल्ल सारडा, संदीप वाघमारे, निलेश लंगोटे आदि पिरंगुट विभागीय  भारतीय कामगार सेना युनिट पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कंपनी व्यवस्थापन सोबत बैठक संपन्न होऊन द्वारसभा पार पडली.