कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) २०१९-२० या आर्थिक वर्षात खातेदारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात ८.५ टक्के व्याज जमा करेल. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ईपीएफओने व्याज ८.१५ आणि ०.३५ टक्क्यांच्या दोन हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला होता.
सरकार दरवर्षी पीएफवर किती व्याज द्यायचं याचा निर्णय घेत असते. त्यानंतर ही व्याजाची रक्कम पीएफ खातेधारकाला वर्ग केली जाते.