केंद्र सरकारची अधिसूचना जारी, ८ मे २०२६ पासून लागू
पुणे : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने कामगारांच्या हिताचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विमाधारक कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिली जाणारी अंत्येष्टि व्यय (Funeral Expenses) ची रक्कम ₹१५,००० वरून थेट ₹२०,००० करण्यात आली आहे.
याबाबतची अधिकृत अधिसूचना भारताच्या राजपत्रात (The Gazette of India) दि. १६ ऑक्टोबर २०२६, सं. ६३३, REGD. No. D. L.-33004/99 अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना कर्मचारी राज्य विमा निगम, नवी दिल्ली यांनी दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केली आहे.
अधिसूचनेतील मुख्य मुद्दे:
काय वाढ झाली? : सामाजिक सुरक्षा (केंद्रीय) नियमावली २०२६ च्या नियम २१ व सामाजिक सुरक्षा संहिता २०२० च्या कलम ३२(१)(ब) नुसार देय अंत्येष्टि व्ययाची रक्कम ₹२०,००० (वीस हजार रुपये) करण्यात आली आहे.
कधीपासून लागू? : ही वाढ ०८ मे, २०२६ पासून प्रभावी झाली आहे. म्हणजेच ८ मे २०२६ नंतर मयत झालेल्या सर्व ESIC धारक कामगारांच्या वारसांना ₹२०,००० चा लाभ मिळणार आहे.
फायदा कोणाला? : ESIC अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कोट्यवधी कामगारांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतिम संस्कारासाठी त्याच्या कुटुंबाला / अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीला ही रक्कम तात्काळ मदत म्हणून दिली जाते.
ही वाढ महागाई आणि सध्याच्या अंत्यसंस्काराच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर कामगारांसाठी अत्यंत आवश्यक होती. केंद्र सरकार आणि ESIC च्या या निर्णयाचे कामगार नामा ट्रस्ट च्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.
ESIC अंत्येष्टि खर्चाची रक्कम ₹१५,००० वरून ₹२०,००० वर वाढवली : नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

