NIPM WRC-26 च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे.
NIPM WRC-26 च्या आयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना परिषदेसाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. यावेळी पालकमंत्री सातारा श्री.शंभूराजे देसाई, धैर्यशील देसाई Co-Convener Western Regional Conference 2026 आणि डॉ. उदय भोसले, अध्यक्ष - NIPM सह्याद्री सातारा चॅप्टर हे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी NIPMच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचारी धोरणे, कौशल्य विकास आणि शाश्वत HR इकोसिस्टम या विषयांवर अशा प्रकारच्या व्यासपीठांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे नमूद केले.
NIPM WRC-26 ही परिषद उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ HR व्यावसायिक, विचारवंत, धोरणकर्ते आणि संस्थात्मक नेतृत्वाला एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. बदलत्या कार्यसंस्कृती, मनुष्यबळ विकास, कौशल्यविकास आणि भविष्यातील HR नेतृत्व या विषयांवर परिषदेत व्यापक विचारमंथन होणार आहे.
उपमुख्यमंत्री स्तरावरून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे NIPM WRC-26 च्या आयोजनाला अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होणार असून, उद्योग आणि शासन यांच्यातील संवादाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
तरी आपण सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि NIPM WRC-26 मध्ये सहभागी होण्यासाठी आजच नोंदणी करावी ही नम्र विनंती. नोंदणी करण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा.
📞 संपर्क : 9145666688

