बॅजेल प्रोजेक्ट्स लिमिटेड (Bajel Projects Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

ऐतिहासिक पगारवाढ करार; कामगारांना ₹22,951 ची वाढ

पुणे : बॅजेल प्रोजेक्ट्स लिमिटेड, रांजणगाव MIDC येथे बॅजेल प्रोजेक्ट एम्प्लॉईज युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीचा ऐतिहासिक करार खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. हा करार राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष मा. श्री. किशोरजी ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

हा करार दिनांक 1 मार्च 2025 ते 30 सप्टेंबर 2028 अशा 3 वर्षे 7 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात आला असून, यामध्ये कामगारांना एकूण ₹22,951/- इतकी घसघशीत पगारवाढ टप्प्यामध्ये देण्याचे ठरले. मागील सर्व फरक (Arrears) देण्याचे देखील व्यवस्थापनाने मान्य केले आहे.

या करारप्रसंगी व्यवस्थापनाकडून प्लांट हेड श्री. योगेश निलजीकर, एच.आर. हेड श्री. रणजीत जगताप, अकाऊंट हेड श्री. रघु कारेगावकर, प्रोडक्शन हेड श्री. राजेंद्र साकोरे, श्री. संतोष वाकडे व श्री. बापू बारहाते उपस्थित होते.

तर कामगार संघटनेकडून अध्यक्ष श्री. अंकुश इचके, जनरल सेक्रेटरी श्री. मंदार दाईंगडे, उपाध्यक्ष श्री. योगेश भोर, खजिनदार श्री. देविदास बेडसे, सह-सेक्रेटरी श्री. संतोष माळी, सदस्य श्री. प्रकाश पुंडे व श्री. रामदास आढाव उपस्थित होते.

करारातील कामगार हिताचे ठळक निर्णय:

1.  बोनस मध्ये ₹9,940/- ची वाढ करून 39870/-रुपये बोनस देण्याचे ठरले

2.  रजेमध्ये 1 रजा वाढ.

3.  करार कालावधीत एक फॅमिली फंक्शनचे आयोजन.

4.  25 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यास ₹12,000/- चे व्हाउचर.

5.  मेडिक्लेम पॉलिसी - ₹3 लाख + ₹3 लाख बफर असे एकूण ₹6 लाख.

6.  कामगाराच्या मृत्यू पश्चात वारसाला 5 पट CTC इतका टर्म इन्शुरन्स.

7.  कॅन्टीनमध्ये चहा-नाश्ता व दूध-केळी मोफत.

8.  रात्रपाळी भत्त्यात ₹50 वाढवून ₹100/-.

9.  सेवानिवृत्ती वेळी ₹10,000/- व ₹2,000/- चे घड्याळ.

10. सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारास ग्रॅच्युइटी 15 ऐवजी 18 दिवसांनी.

11. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास एक C-off व ओव्हरटाईम.

करारानंतर सर्व कामगारांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला.