जे एफ ई सोजी स्टील इंडिया प्रा. लि. (JFE Shoji Steel India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि जे एफ ई शोजी स्टील इंडिया कर्मचारी संघटना यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार यशस्वीरित्या, शांततेत आणि जल्लोषात संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्टये खालील प्रमाणे :
कराराचा कालावधी : दि. 01/04/2026 ते 31/03/2029 (3 वर्षे)
एकूण थेट पगारवाढ: रु. 22,000/-
- बेसिक + महागाई भत्ता = 60%
- स्पेशल भत्ता = 20%
- घरभाडे भत्ता (HRA) = उर्वरित रक्कम
- धुलाई भत्ता = रु. 1,000/-
- बोनस = रु. 34,000 + इन्सेंटिव्ह (नफ्यावर आधारित)
- भविष्य निर्वाह निधी (PF) 1 एप्रिल 2026 पासून मूळ वेतनावर 12% लागू.
- दिवाळी भेटवस्तू (ऍमेझॉन कार्ड 2000/-)
- सुकामेवा डबल दिला जाईल.
- साप्ताहिक सुट्टी - रविवारी
- साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास 1 C-Off + Overtime
- सण/उत्सव व कंपनीने जाहीर केलेल्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास 1 C-Off + Overtime
- वार्षिक रजा (AL) - 18 + 2 ने वाढ, एकूण 30 दिवस पुढील वर्षी Carry Forward करता येईल
- प्रसंगिक रजा (CL) - 10 दिवस
- शोक रजा - 5 दिवस
- आजारपणासाठी अतिरिक्त 5 दिवसांची विशेष तरतूद (AL/CL संपल्यानंतर)
- सार्वजनिक सुट्टी - 13 दिवस
- गुढीपाडवा, दसरा, दिवाळी - वर्षातून 3 वेळा विशेष जेवण
- दरवर्षी 4 गणवेश सेट व 1 जोडी सेफ्टी शूज
- वर्षातून एकदा शारीरिक तपासणी
- ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी - रु. 5 लाख
- अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी - रु. 20 लाख
- टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी - रु. 25 लाख
- दरवर्षी क्रीडा दिनाचे आयोजन
- दरवर्षी फॅमिली डे - कर्मचारी आपल्या आई-वडिलांसह (पालकांसह) सहभागी होऊ शकतात.
- 10 वर्षे पूर्ण - रु. 10,000/-
- 15 वर्षे पूर्ण - रु. 15,000/-
- 20 वर्षे पूर्ण - रु. 20,000/-
- 25 वर्षे पूर्ण - रु. 25,000/-
करार करण्यासाठी व्यवस्थापन प्रतिनिधी तर्फे व्यवस्थापकीय संचालक - श्री. ताकेशी ताकाझावा, सल्लागार GM - श्री. कोहेई फुजीकी, DGM HR & GA - श्री. संजयकुमार सूर्यवंशी, सल्लागार GM - सौ. शितल चौधरी तसेच संघटनेतर्फे अध्यक्ष - श्री. गोवर्धन मावळे, उपाध्यक्ष - श्री. विशाल जगदाळे, जनरल सेक्रेटरी - श्री. शरद बनकर, सह. सेक्रेटरी - श्री. जहीर शेख, खजिनदार - श्री. दीपक देशमुख, सदस्य - श्री. योगेश राजगुरू, श्री. विलास शेरकर हे उपस्थित होते.
करार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन श्रमिक एकता महासंघाचे श्री.मारुती जगदाळे (प्रमुख सल्लागार ), श्री.किशोर सोमवंशी (अध्यक्ष), श्री.रोहित पवार (जनरल सेक्रेटरी), श्री.अरुण घुले (MEPL जनरल सेक्रेटरी) यांचे मिळाले.
हा करार यशस्वी होण्यासाठी कंपनीमधील सर्व कामगारांनी दाखवलेले सकारात्मक काम, राखलेला संयम, केलेले सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे युनियन कमिटीवर ठेवलेला विश्वास, यामुळेच हा करार शक्य झाला.


