पुणे : बजाज ऑटो लिमिटेड, चाकण येथील विश्वकल्याण कामगार संघटनेच्या (VKKS) वतीने आज गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी कमलनयन बजाज पुतळा, शिवाजीनगर, पुणे येथे कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला.
या वेळी विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलीप पवार यांनी कमलनयन बजाज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधणे आणि कामगारांच्या हक्कांसाठी एकजुटीने, शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कामगारांच्या प्रमुख मागण्या : या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून संघटनेने पुढील मागण्या ठामपणे मांडल्या
प्रलंबित वेतन करार : १ जुलै २०२६ पासून लागू होणारा वेतन करार तातडीने पूर्ण करून कामगारांना न्याय द्यावा.
समान रजा, समान न्याय : व्यवस्थापनाप्रमाणे कामगारांनाही वर्षाला ४२ दिवसांची रजा देण्यात यावी.
VDA बंद करण्यास विरोध : कामगारांच्या वेतनाचा महत्त्वाचा भाग असलेला VDA बंद करण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात यावा.
बोनस फ्रीज करण्यास विरोध : कामगारांच्या हक्काच्या बोनसवर निर्बंध आणणारा बोनस फ्रीज करण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात यावा.
संघटनेच्या मते, कंपनीच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कंपनीच्या यशामागे कामगारांची मेहनत, कौशल्य आणि समर्पण आहे. त्यामुळे कामगारांना न्याय्य वेतन, समान सुविधा, सन्मानजनक कामाचे वातावरण आणि त्यांच्या हक्कांनुसार लाभ मिळणे आवश्यक आह
"कामगारांचे हक्क कमी करणारे प्रस्ताव मान्य नाहीत! न्याय्य वेतन, समान सुविधा आणि कामगारांचा सन्मान मिळालाच पाहिजे!" ही ठाम भूमिका या आंदोलनातून मांडण्यात आली.
कॅन्डल मार्चच्या माध्यमातून कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवत कामगार एकजुटीचा संदेश दिला. प्रलंबित वेतन करार लवकरात लवकर मार्गी लावून कामगारांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

