पुणे : लोणीकंद येथील FIT Voltara India Private Limited आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यातील वेतनवाढीचा महत्त्वपूर्ण करार दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
करार कालावधी : तीन वर्ष ( दि.1 ऑक्टोबर 2025 ते दि.30 सप्टेंबर 2028)
तीन वर्षांसाठी वेतनवाढीची रचना पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
पहिले वर्ष 55% = ₹7,755/- प्रति महिना
दुसरे वर्ष 25% = ₹3,525/- प्रति महिना
तिसरे वर्ष 20% = ₹2,820/- प्रति महिना
इनडायरेक्ट बेनिफिट्सचा अतिरिक्त लाभ : याशिवाय इनडायरेक्ट बेनिफिट्सच्या माध्यमातून साधारण ₹3,000/- चा अतिरिक्त लाभ कामगारांना मिळणार आहे. या ₹3,000/- चा अतिरिक्त आर्थिक भार कंपनीकडून उचलण्यात येणार आहे.
तसेच साधारण 8 महिन्यांचे अंदाजे ₹62,000/- एरियर्स या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत कामगारांच्या खात्यावर जमा करण्याचे मान्य केले आहे.
बोनस : ₹15,000 वरून ₹25,000/- करण्यात आला.
मेडिकल पॉलिसी : ₹2 लाखांवरून ₹3 लाख करण्यात आली कुटुंबासहित (With Family).
मासिक हजेरी बोनस : ₹500 वरून ₹2,000/- करण्यात आला.
बर्थडे गिफ्ट : प्रत्येक कामगारासाठी ₹1,000/- करण्यात आले.
फॅमिली स्नेहसंमेलन : दोन वर्षांतून एकदा फॅमिली स्नेहसंमेलन आयोजित करण्यास मान्यता.
ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : यापूर्वी CTC च्या ३ पट असलेली पॉलिसी आता ५ पट करण्यात आली.
शिवजयंती उत्सव : कंपनीमध्ये शिवजयंती साजरी करण्यास मान्यता मिळाली.
मॉनिटर अलाउन्स : कंपनीमध्ये मॉनिटर म्हणून काम करणाऱ्या कामगारांसाठी नव्याने ₹2,000/- मॉनिटर अलाउन्स सुरू करण्यात आला.
सणासुदीची आगाऊ रक्कम : सणासुदीच्या काळात कामगारांना ₹20,000/- आगाऊ रक्कम देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. सदर रकमेची परतफेड 4 हप्त्यांमध्ये करण्यात येईल.
लिव्ह बँक : लिव्ह साठवण्याची मुभा 30 दिवसांवरून 40दिवसांपर्यंत करण्यात आली आहे.
टू-इन-वन जॅकेट : प्रत्येक कामगाराला वर्षातून एकदा टू-इन-वन जॅकेट देण्याचे मॅनेजमेंटने मान्य केले आहे.
सेवा सन्मान : कंपनीमध्ये 10 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कामगाराला ₹10,000/- आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. तसेच 15 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कामगाराला ₹15,000/- आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्याचे मॅनेजमेंटने मान्य केले आहे.
सदर महत्त्वपूर्ण करार शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष श्री.संतोष अण्णा बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कराराच्या वेळी उपस्थित मॅनेजमेंटच्या वतीने श्री. मायकल शेडे (कंपनी एमडी), श्री. दिनेश पवळे — (एच आर मॅनेजर), श्री. धनुभाई मोभ (प्रोडक्शन/ मेन्टेनन्स मॅनेजर), श्री. मंगेश पवार (कॉलिटी मॅनेजर), श्री.अंकुश तिकुडे (स्टोअर मॅनेजर), श्री.विकास मोलपाटे (फायनान्स मॅनेजर) तसेच मॅनेजमेंटचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
शिवगर्जना कामगार संघटनेच्या स्थानिक युनिटच्या वतीने युनिट प्रतिनिधी श्री. वैभव लोंढे, श्री.प्रदीप चव्हाण, श्री.रामजी शिंदे, श्री.मुकुंद पोटभरे, श्री.समाधान संकपाळ यांच्या उपस्थितीत हा करार यशस्वीरीत्या संपन्न झाला.
करार यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर कामगारांनी एकमेकांना पेढे भरवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्यानंतर डीजेच्या तालावर गुलाल उधळत जल्लोष करून या आनंदाच्या क्षणाचा उत्साहात आनंद साजरा करण्यात आला.

