'नवीन कामगार कायद्यांवर' बहु-हितधारक कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. 02/09/2026: वर्क फेअर अ‍ॅन्ड फ्री, इंडिया लेबरलाइन आणि आजिविका ब्युरो यांच्या पुढाकाराने पुण्यात पत्रकार भवन येथे नवीन कामगार कायदे व कामगार हक्कांविषयी कार्यशाळाचे आयोजन पत्रकार भवन येथे करण्यात आले. 

'Labour laws in transition: Understanding the labour codes and what they mean for workers' या कार्यशाळेस 80 हून अधिक लोकांची उपस्थिती होती. सरकारी विभागांचे अधिकारी, न्यायिक क्षेत्रातील मान्यवर व वकील, सामाजिक संस्था व कार्यकर्ते, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कामगार नामा यांचा प्रमुख सहभाग होता. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम गुरव यांनी केले. या कार्यशाळेच्या दरम्यान मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे सदस्य, सचिव श्रीमती आर. आर. देशपांडे आणि 11व्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. नारवेकर यांनी उपस्थित राहून नवीन कायद्यांची संक्षिप्त माहिती दिली व कामगारांची न्यायापर्यंत पोहोच कशी सुलभ करता येईल याबाबत सांगितले. 

तसेच प्रादेशिक कामगार आयुक्त (केंद्रीय), पुणे मधून अश्वनी कुमार चतुर्वेदी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अकुर्डीचे प्रादेशिक आयुक्त सनत कुमार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे तळेगाव दाभाडे व खडकी शाखांचे व्यवस्थापक सतीश बाबर व नीरज कुमार तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय पुणे याचे विभागीय उपसंचालक अंकुश खराडे यांनी नवीन कायद्यांतील महत्त्वाचे बदल व तरतुदींविषयी मार्गदर्शन केले. बाल कामगार कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राणी खेडीकर यांनीही संवाद साधला. 

सामाजिक सुरक्षा व व्यावसायिक सुरक्षा व नवीन कायदे अंमलबजावणीच्या प्रक्रिये या मुद्द्यांवर चर्चा सत्र घेण्यात येणार आले. या पॅनलमध्ये कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीचे योगेश मंजुळा, सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अँड रिसर्चचे आनंद बखाडे, सेफ इन इंडियाचे जगदीप बनसोड, इंडिया लेबर लाइनच्या रेश्मा जगताप यांनी विचार मांडले व त्याचे संचालन वर्क फेअर अ‍ॅन्ड फ्रीच्या पुणे प्रमुख स्वाती जाधव यांनी केले.

अनौपचारिक स्थलांतरित कामगारांच्या दृष्टिकोनातून कामगार संहितांचे विश्लेषण इंडिया लेबरलाइनचे संचालक संतोष पूनिया यांनी मांडले, तर कामगार समुदायांपर्यंत कायदे पोहोचवण्याबाबत आजिविका ब्युरोचे दीपक पराडकर यांनी सामूहिक कृतीवर भर दिला. साहेबराव वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.