महाड: महाड औद्योगिक क्षेत्रामधील सिनेर्जीया केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये काल रात्री दहा वाजता स्फोट झाला असून या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होते की आजूबाजूच्या गावाला भूकंपा सारखा धक्का बसला या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाल्याचे वृत्त हाती आलेले नाही असे वृत्त पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे.
महाड औद्योगिक क्षेत्र मधील जी 57 या प्लॉटमध्ये सायनेर्जीया केमिकल हा कारखाना असून प्राथमिक माहितीनुसार या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असलेल्या रिॲक्टरचा स्फोट झाला आहे. या घटनेनंतर कंपनीमध्ये धूर येऊ लागल्याने महाड एमआयडीसी तसेच कारखान्यातील अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना झाले.
रुग्णवाहिका देखील तातडीने घटना स्थळी नेण्यात आले. या कारखान्यांमध्ये कामगार काम करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचे बाबत अद्याप माहिती मिळालेली आहे. तीन कामगार जखमी कामगाराला एम एम ए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस यंत्रणा देखील घटनास्थळी रवाना झाली आहे. कारखान्यामध्ये नक्की किती कामगार काम करत होते तसेच कोणत्या प्रकारची हानी झाली आहे याचा तपास घेतला जात आहे.
या कारखान्यातील हा स्फोट इतका भयानक होता की कंपनीच्या परिसरामध्ये असलेल्या बिरवाडी, काळीज सवाणे, नडगाव या परिसरामध्ये जोरदार झटके बसले. स्फोट तीव्रतेमुळे जीवित हानीची शक्यता देखीली व्यक्त केली जात आहे.

