राज्य सरकारी कर्मचारी यांच्या महागाई भत्या मध्ये 2 टक्क्यांनी वाढ

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने वाढ केली होती आता राज्य सरकारनेही त्याचे अनुकरण केले आहे. आता 2% अधिक महागाई भत्ता राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

    1 जानेवारी 2026 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58 टक्क्यांवरुन तो 60 टक्क्यांवर नेला आहे. हा महागाई भत्ता वाढ जानेवारी 2026 ते जुलै 2026 पासूनच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत.तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपध्दती आहेत त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्याच्या दारात 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी : क्लिक करा