राष्ट्रीय पेन्शन योजनेवरील परिसंवादास उद्योग क्षेत्रातील HR व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (NIPM) पिंपरी-चिंचवड-चाकण चॅप्टर पीसीसी चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System - NPS) या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन चिंचवड येथील हॉटेल ग्रँड एक्सोटिका -चिंचवड येथे (दि. २६ जुलै) उत्साहात पार पडले. पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड-चाकण परिसरातील विविध व प्रमुख औद्योगिक आस्थापनातील  मानव संसाधन (HR)  अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कार्यक्रमात पी एफ आर डी ए चे उप महाव्यवस्थापक श्री. इस्माईल सलाम तसेच श्री. सदबीर सिंघ गांधी (टेरिटरी मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया) यांनी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय पेन्शन योजनेचे महत्त्व, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन, कर सवलती, NPS मधील गुंतवणुकीचे पर्याय तसेच कर्मचारी व नियोक्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध लाभांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित HR व्यावसायिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे देत NPS संदर्भातील अनेक गैरसमज दूर केले.

    एचडीएफसी पेन्शन फंड्स चे वरिष्ठ व्यवस्थापक श्री देबराता रॉय यांनी प्रत्यक्षपणे वयानुसार व ऐच्छिक कॉन्ट्रीब्युशन नुसार वयाच्या ६० व्या किंवा ५८ व्या  वर्षी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन व रकमेच्या मिळणाऱ्या लाभाविषयी उपस्थितांना उदाहरणासह समजावून सांगितले.

    कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी केपीएमजीच्या सल्लागार सौ. अनिशा गोयल यांनी समारोपपर मनोगत व्यक्त करत उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी HR व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले.

    यावेळी NIPM  पीसीसी चॅप्टरचे अध्यक्ष श्री. प्रदिप मानेकर यांनी उपस्थित HR व्यावसायिकांना मार्गदर्शन करत पीसीसी चॅप्टरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कर्मचारी कल्याण, ज्ञानवृद्धी आणि एच आर क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सर्व उद्योगांतील HR व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा तसेच आपल्या अस्थापनातील कर्मचारी आणि संस्थेला विविध उपक्रमांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती पाटील यांनी केले, तर श्री. अमित देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    या यशस्वी कार्यक्रमासाठी NIPM पीसीसी चॅप्टरचे अध्यक्ष श्री. प्रदिप मानेकर, सचिव श्री. नवनाथ सूर्यवंशी तसेच कोअर कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास NIPM पीसीसी चॅप्टरचे संस्थापक श्री. अमोल कागवाडे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सदस्य श्री. निलेश नाफडे, श्री. राहुल निंबाळकर, श्री. अमित देशपांडे, सीमंतिनी काटकर, श्री. मधुकर सूर्यवंशी, श्री. रमेश बागल, महाराज बुंदेल, सतीश कुलकर्णी, तुषार पाचुंदकर, श्री. विजय पाटील, महेंद्र फणसे, सुरज धजल, अक्षय जाधव, मयुरेश सुतार, ललित भागवत, प्रभाकर कुलकर्णी यांच्यासह चाप्टरचे सदस्य हे मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते.

    राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत जागरूकता निर्माण करणे, उद्योग क्षेत्रातील HR व्यावसायिकांना अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रभावी निवृत्ती नियोजनाचा प्रसार करणे हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता. उपस्थितांनी कार्यक्रमाचे नियोजन, विषयाची मांडणी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासंदर्भात एमआयपीएम पीसीसी चे विशेष कौतुक करत अशा उपयुक्त उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे आस्थापनांना जर ही योजना समाविष्ट करावयाची असेल तर चाप्टरच्या प्रतिनिधींना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.