'विद्युत सुरक्षा' (Electrical Safety) विषयावरील प्रशिक्षण सत्र संपन्न

दि. २२ जुलै २०२६ रोजी श्री. विजय कसबे - व्यवस्थापक इंडिटेक व्हॉल्व्हस प्रा.ली. मरकळ व मार्ग ह्यांच्या सयुंक्तपणे आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रा मध्ये खालील सन्मानीय व्यक्तींनी सहभाग खुपच मोलाचा ठरला :

१. श्री. अविनाश सुतार - ज्यांनी अत्यंत रंजक आणि अर्थपूर्ण पद्धतीने हे सत्र पार पाडले. त्यांनी दिलेली उपयुक्त माहिती आमच्या ज्ञानात मोलाची भर घालणारी ठरली.

२. 'मार्ग ग्रुप' (Marg Group) जो कि डिश चे उपसंचालक श्री. स्वप्नील देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध औद्योधिक संस्थांना एकत्रित करून त्यांना विविध ट्रेनिंग सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी निर्मित करण्यात आलेला आहे .

३. इंद्रायणी इंडस्ट्रीज असोशिएशन चे प्रेसिडेंट तथा एनआयपीएमचे कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि रिंगफीडर पॉवर ट्रान्समिशन इंडिया प्रा ली चे सरव्यवस्थापक श्री. महेंद्र फाणसे ह्यांचा प्रत्यक्ष सहभाग व मार्गदर्शन उपयुक्त ठरले .

४.श्री. राजेंद्र पाटील - ज्यांनी हे सत्र आयोजित करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

५. सुशील आणि इंडिटेक व्हॉल्व्हस प्रा.ली. मरकळ ची  संपूर्ण अंतर्गत टीम - ज्यांनी उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्था केली.

सत्राची ठळक वैशिष्ट्ये:
- १७ कंपन्यांचा सहभाग
- ५२ सहभागींची उपस्थिती
- हे सत्र अत्यंत संवादात्मक होते आणि सर्वांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

एकंदरीत, आजचे सत्र अत्यंत अर्थपूर्ण ठरले आणि विविध संस्था व उद्योगांमध्ये सुरक्षिततेच्या पद्धती अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल होते.

सुरक्षिततेच्या या उपक्रमात इंडिटेक व्हॉल्व्हस प्रा.ली. मरकळ चे  योगदान नक्कीच मोलाचे ठरणार आहे असे सर्वच वक्त्यांनी व्यक्त केले.