पुणे : महाराष्ट्र राज्यातील कामगार क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध कामगार संहितांच्या अनुषंगाने, राज्य शासनाने महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम, २०२६ नवीन नियमांचे प्रारूप जाहीर केले आहे. संबंधित हे नियम राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले असून, यावर संबंधित घटक आणि नागरिकांकडून पुढील ४५ दिवसांचे आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आलेले खालील प्रारूपही अधिसूचनेद्वारे जनसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे तसेच राजपत्रात अधिकृतपणे प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्व नवीन कोड खालील प्रमाणे त्यांचे प्रारूप प्रसिद्ध दिनांक व यावरती हरकती व सूचना देण्याकरिता अंतिम दिनांक खालील प्रमाणे
हरकती व सूचना नोंदविणे अंतिम दिनांक - १९ जून २०२६
या नियमांच्या सविस्तर अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in आणि कामगार विभागाचे संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर ‘कायदा व नियम’ या शीर्षकाखाली संपूर्ण मसुदा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
१) कर्मचारी भरपाई कायदा, १९२३
२) कर्मचारी राज्य विमा कायदा, १९४८
३) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, १९५२
४) मातृत्व लाभ कायदा, १९६१
५) ग्रॅच्युइटी पेमेंट कायदा, १९७२
६) असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, २००८
७) सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) अधिनियम, १९५९
८) सिने-कामगार कल्याण निधी कायदा, १९८१
९)इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर कायदा, १९९६
या अधिसूचनेवर नमूद केलेल्या ४५ दिवसांच्या कालावधीत औद्योगिक आस्थापना, विविध कामगार संघटना, सामाजिक संस्था किंवा कोणतीही व्यक्ती आपल्या हरकती आणि सूचना नोंदवू शकते. या सूचना लेखी स्वरूपात ‘कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-२०, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१’ या कार्यालयात पाठवता येतील. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना आपल्या हरकती mh.labourcodes.rules@gmail.com या अधिकृत ईमेल आयडीवरही पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विहित मुदत संपण्यापूर्वी प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व हरकतींचा राज्य शासन सखोल विचार करणार असून, त्यानंतरच या नियमांना अंतिम स्वरूप दिले जाईल. राज्यातील औद्योगिक शांतता आणि कामगार कल्याण अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त संबंधितांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले मत नोंदवावे असे आवाहन कामगार नामा वतीने करण्यात आले ज्या व्यक्ती, कामगार, संघटना यांना सूचना व हरकती नोंदविण्यासाठी draft पाहिजे असेल तर मोबाईल नं. 8983070380 यावरील whatsapp मेसेज करावा असे कळविले आहे.
