कारखान्यात एखादा क्षण असा असतो..की.. एक चूक, एक निष्काळजीपणा, एक न दिसलेला धोका... आणि सगळे बदलून जाते. यंत्र थांबते, हॉर्न वाजतो, माणसे धावतात. Ambulance येते. Report लिहिला जातो. काही दिवसांनी सगळे 'नॉर्मल' होते ..कारखाना पुन्हा सुरू होतो, उत्पादन पुन्हा सुरू होते. पण एका घरात? एका कुटुंबात? एका मनात? कधीच नॉर्मल होत नाही.
आपण अपघाताची किंमत नेहमी पैशात मोजतो .. Compensation किती, Medical Bill किती, Fine किती. पण अपघाताची खरी किंमत कितीतरी खोल आणि कितीतरी विस्तृत असते. काही दिसते आणि काही दिसत नाही. काही मोजता येते आणि काही मोजता येत नाही. आज आपण ती सगळी किंमत समजून घेणार आहोत. कारण जेव्हा ही किंमत खऱ्या अर्थाने कळेल तेव्हाच Safety नियम नाही, जगण्याचा मार्ग बनेल.
" एक अपघात म्हणजे फक्त एक घटना नाही तो एक भूकंप असतो, जो अनेक आयुष्ये हादरवतो."
सुरेशची कहाणी एक वास्तव
सुरेश ( काल्पनिक नाव) , वय 39. एका कारखान्यात कंत्राटी Operator म्हणून काम करत असतो. घरी पत्नी, दोन मुले ..एक 14 वर्षांचा, एक 12 वर्षांचा. म्हातारे आईवडील गावी. दरमहा पगार 18,000 रुपये..कुटुंबाचा एकमेव आधार.
एका दुपारी, एका क्षणाच्या निष्काळजीपणात Rotating Equipment जवळ हात गेला. हात गेला नाही, पण तीन बोटे गेली. सुरेश रुग्णालयात. शस्त्रक्रिया. तीन आठवडे रुग्णालय. दोन महिने घरी. नंतर कामावर परत .. पण आता त्याच काम करण्याची क्षमता नाही. Operator म्हणून नाही, Helper म्हणून 12,000 रुपये. त्या दिवसापासून सुरेशच्या घरात जे घडले ते कोणत्याही Accident Register मध्ये नोंदवले गेले नाही. पण ते घडले. आजही घडते.
"सुरेशची कहाणी एकट्या सुरेशची नाही ती भारतातील लाखो कामगार कुटुंबांची कहाणी आहे."
१. शारीरिक किंमत
सुरेशची तीन बोटे परत येणार नाहीत. पण त्याहून जास्त त्याच्या शरीराची क्षमता कायमची बदलली. जड काम करता येणार नाही. थकवा लवकर येतो. झोप नीट होत नाही. नसलेल्या बोटांमध्ये जाणवणारी वेदना रात्री जागवते. कारखान्यातील अपघातात दरवर्षी लाखो कामगार कायमस्वरूपी अपंगत्व, दृष्टी हानी, श्रवण हानी, किंवा श्वसनाचे आजार घेऊन घरी जातात आणि हे आजार आयुष्यभर सोबत राहतात.
२. मानसिक किंमत
शरीराची जखम भरते ... मनाची जखम? सुरेशला आता कारखान्यात जाताना भीती वाटते. त्या मशीनजवळ उभे राहणे जमत नाही. Flashback येतात.. त्या क्षणाचे, त्या आवाजाचे, त्या वेदनेचे. याला Post-Traumatic Stress Disorder (PTSD) म्हणतात. अभ्यास सांगतो की गंभीर अपघातातून वाचलेल्या 30-40% कामगारांना दीर्घकालीन मानसिक त्रास होतो Depression, Anxiety, आत्मविश्वास गमावणे. पण मानसिक उपचाराची सोय किती कारखान्यांमध्ये आहे?
३. आत्मसन्मानाची किंमत
सुरेशला सर्वात जड वाटते ते वेगळेच आहे .."मी माझ्या मुलांसमोर आता लहान झालो आहे." जो माणूस घराचा आधार होता, तो आता दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून आहे. पत्नीला जास्त काम करावे लागते. मुलांचे शिक्षण अडले. आईवडिलांची काळजी घेता येत नाही. हा आत्मसन्मानाचा घाव ..शरीराच्या घावापेक्षाही खोल असतो. आणि तो कोणत्या Accident Report मध्ये दिसत नाही.
कौटुंबिक आणि सामाजिक किंमत
१. कुटुंबावरील प्रत्यक्ष परिणाम
सुरेशच्या पत्नीने घरकाम सोडून बाहेर काम धरले घर चालवण्यासाठी. मोठ्या मुलाचे शाळेतील Extracurricular Activities बंद झाल्या कारण पैसे नाहीत. धाकट्याला Private Tuition सोडावे लागले. आजारी आईवडिलांची गावी काळजी घेणारे कोणी नाही. घरात आर्थिक ताण, मानसिक तणाव, आणि प्रत्येक रात्री एक अव्यक्त भीती .. उद्या काय होईल?
जर सुरेश गेला असता म्हणजे अपघात जीवघेणा असता तर हे चित्र आणखी भयावह असते. विधवा पत्नी, अनाथ मुले, वृद्ध आईवडील आणि एक Compensation चा धनादेश, जो या सगळ्या दुःखाची किंमत मोजण्याचा प्रयत्न करतो. पण करू शकत नाही.
२. मुलांवरील दीर्घकालीन परिणाम
हे सर्वात दुर्लक्षित सत्य आहे. अपघातग्रस्त कामगाराच्या मुलांवर मानसिक परिणाम होतो त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या स्वप्नांवर, त्यांच्या बालपणावर. सुरेशचा मोठा मुलगा आता 14 वर्षांचा पण तो घरात मोठा झाला आहे. वडिलांची काळजी घेतो, आईला मदत करतो. बालपण संपले अपघाताच्या त्या एका दिवशी.
३. सामाजिक किंमत
एक कामगार अपघातग्रस्त झाला की त्याचे कुटुंब समाजात एका वेगळ्या स्थितीत जाते. कर्ज घ्यावे लागते. नातेवाईकांकडे मदत मागावी लागते. अनेकदा गाव सोडावे लागते. मुलाचे ,मुलींचे लग्न अवघड होते. कामगाराची ओळख बदलते 'तो अपघातग्रस्त' ..आणि ही ओळख कुटुंबाला वर्षानुवर्षे सोबत राहते. एक अपघात एका माणसाला नाही, एका कुटुंबाला हादरवतो.
प्रत्यक्ष आर्थिक किंमत (Direct Costs)
अपघाताची आर्थिक किंमत म्हणजे एक हिमखंडासारखी असते ..वरचा भाग दिसतो, खालचा भाग दिसत नाही. प्रत्यक्ष किंवा Direct Costs म्हणजे तो दिसणारा भाग जो लगेच जाणवतो, मोजता येतो.
कारखान्याला होणारे Direct Costs:
Medical Expenses : रुग्णवाहिका, Emergency Treatment, शस्त्रक्रिया, रुग्णालय, औषधे ,सुरेशच्या बाबतीत काही लाख खर्च झाले.
Compensation : Workmen's Compensation Act अंतर्गत कायदेशीर भरपाई Permanent Partial Disability साठी काही लाख द्यावे लागले
Production Loss: अपघात झाला त्या दिवशी त्या विभागातील उत्पादन थांबले 4 ते 6 तास. प्रत्येक तास = काही लाखांचे नुकसान.
Equipment Damage: अपघातात यंत्र किंवा साधने खराब झाली असतील तर Repair किंवा Replacement काही लाखात जाते
Regulatory Fine: Factory Inspector Enquiry, DISH Notice, Fine हा काही लाखात जातो.
कामगाराला होणारे Direct Costs:
पगार बंद किंवा कमी, औषधांचा खर्च, प्रवासाचा खर्च, घरचे कर्ज यासाठी पैसे कुठून आणायचे ? कर्ज काढून आणि ते कर्ज आजही फेडले जात आहे.
"एका अपघाताची Direct Cost कारखाना आणि कामगार मिळून ₹10 ते 50 लाखांपर्यंत जाऊ शकते."
अप्रत्यक्ष आर्थिक किंमत (Indirect Costs)
Heinrich च्या प्रसिद्ध सिद्धांतानुसार प्रत्येक Direct Cost च्या मागे 4 ते 10 पट Indirect Cost लपलेली असते. म्हणजे ₹10 लाखांच्या Direct Cost मागे ₹40 ते 100 लाखांचे Indirect नुकसान! हे दिसत नाही, मोजले जात नाही पण होते.
कारखान्याला होणारे Indirect Costs:
Productivity Loss: सुरेशबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनोबल खाली आले. त्या दिवशी आणि पुढील काही दिवस त्यांची Efficiency 20-30% कमी झाली. 'आपल्यालाही असे होईल का?' हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात.
Recruitment आणि Training: नवा Operator आणणे, त्याला Train करणे म्हणजे वेळ आणि पैसा खर्च करणे.
Investigation आणि Documentation : Accident Investigation, Root Cause Analysis, CAPA तयार करणे, Regulatory Compliance यात कारखान्यातील अधिकाऱ्यांचाअनेक दिवसांचा वेळ खर्च.
Reputation Loss: कारखान्याचा Incident Rate वाढतो. Customer Audit मध्ये प्रश्न विचारले जातात. Order मिळणे कठीण होते.
Insurance Premium: पुढील वर्षी Workmen's Compensation Insurance Premium वाढते कारण Claim History बिघडल्यामुळे
Management Time: Plant Head, HR, Safety Officer, Legal Team सगळ्यांचा अनेक दिवसांचा वेळ या एका Incident साठी.
कामगाराला होणारे Indirect Costs:
Promotion थांबते, Career Growth संपते, Social Status बदलतो, मुलांच्या भविष्याची स्वप्ने मागे जातात या सगळ्याची किंमत पैशात मोजता येत नाही, पण ती वास्तव आहे.
"Heinrich च्या सिद्धांतानुसार दिसणाऱ्या प्रत्येक ₹1 च्या मागे ₹4 ते ₹10 दडलेले असतात."
राष्ट्रीय आणि सामाजिक किंमत
औद्योगिक अपघात हे केवळ कारखान्याचा प्रश्न नाही ते राष्ट्राचा प्रश्न आहे. ILO (International Labour Organization) सांगते की जगभरात दरवर्षी 2.3 दशलक्ष कामगार occupational accidents आणि diseases मुळे मृत्युमुखी पडतात. भारतात दरवर्षी नोंदवलेले अपघात लाखांच्या घरात आहेत आणि न नोंदवलेले अपघातांचे काय?
प्रत्येक अपघातग्रस्त कामगार म्हणजे एक करदाता कमी, एक उत्पादक नागरिक कमी. सामाजिक सुरक्षा योजनांवर भार येतो. GDP वर परिणाम होतो. ILO च्या अंदाजानुसार Occupational Injuries आणि Illnesses मुळे जगाच्या GDP चे 4% नुकसान होते भारताच्या संदर्भात हे लाखो कोटी रुपये आहे. आणि सर्वात महत्त्वाचे .. प्रत्येक अपघात म्हणजे एक अनुभवी कामगार गमावणे. त्याचे कौशल्य, त्याचे ज्ञान, त्याचे योगदान हे परत येत नाही. हे राष्ट्राची Human Capital आहे आणि ती जपणे हे प्रत्येक कारखान्याचे, प्रत्येक व्यवस्थापनाचे, प्रत्येक Supervisor चे आणि प्रत्येक सहकाऱ्याचे कर्तव्य आहे.
अपघाताचा हिमखंड
समुद्रात हिमखंड दिसतो तेव्हा फक्त 10% वर असतो 90% पाण्याखाली लपलेला असतो. अपघाताची किंमत तशीच आहे. दिसणारे: Medical Bill, Compensation, Fine, Equipment Damage हे 10%. न दिसणारे: Morale Loss, Productivity Drop, Reputation Damage, Career Loss, Family Destruction, Psychological Trauma, Social Stigma, National Loss हे 90%. जो फक्त दिसणारी किंमत पाहतो, तो खऱ्या नुकसानाचा 1/10 भाग पाहतो. आणि म्हणूनच "Safety वर खर्च करणे म्हणजे Investment आहे अपघात झाल्यावर त्याहून 10 पट जास्त खर्च येतो."
सगळे वाचल्यावर एक प्रश्न मनात येतो की हे टाळता येते का? उत्तर आहे ... हो, बहुतांश अपघात टाळता येतात. अभ्यास सांगतो की 96% अपघात preventable आहेत म्हणजे त्यांच्या मागे एक तरी चूक अशी होती की जी सुधारता आली असती आणि अपघात टाळता आला असता.
Safety Training : प्रत्येक कामगाराला योग्य प्रशिक्षण द्यावे कारण अज्ञान हे अपघाताचे सर्वात मोठे कारण आहे.
PPE आणि Engineering Controls : योग्य PPE वापरणे आणि Machine Guarding हे पहिले संरक्षण आहे.
Near Miss Reporting: प्रत्येक Near Miss हे एक Warning Sign आहे ते लपवणे नाही, सांगणे. जो Near Miss Report करतो, तो पुढचा मोठा अपघात रोखतो.
Behavior Based Safety (BBS): Unsafe Behavior वेळेत ओळखणे आणि सुधारणे .. शिक्षेसाठी नाही, सुरक्षिततेसाठी.
Management Commitment: Safety ही केवळ Safety Officer ची जबाबदारी नाही ती CEO पासून Gate पर्यंत प्रत्येकाची जबाबदारी आहे.
लक्षात ठेवा ...Safety हे केवळ Compliance नाही. PPE हे केवळ नियम नाही. Toolbox Talk हे केवळ Formality नाही. ते सुरेशसारख्या लाखो कामगारांचे रक्षण आहे .. त्यांच्या हाताचे, त्यांच्या कुटुंबाचे, त्यांच्या स्वप्नांचे.
पुढच्या वेळी जेव्हा Safety नियम पाळणे कठीण वाटेल, PPE घालणे त्रासदायक वाटेल, Near Miss सांगत नसाल ..तेव्हा एक क्षण थांबा स्वतःला विचारा "माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून द्यायचे आहे का ? त्यांना रस्त्यावर आणायचे आहे का ? आणि ते होऊ नये यासाठी मी आज काय करतो?
लक्षात ठेवा .."Safety म्हणजे नियम नाही ... Safety म्हणजे तुमच्या कुटुंबाला दिलेले वचन आहे."
(सदर लेख 'कामगार नामा मॅगझीन' मध्ये प्रसिद्ध झाला आहे)
- लेखक परिचय
गिरीश अनिल कुलकर्णी यांनी रासायनिक उत्पादन क्षेत्रात २५ पेक्षा जास्त वर्षे कार्य केले असून पर्यावरण, आरोग्य, सुरक्षितता आणि शाश्वतता (EHS & Sustainability) या विषयांमध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. केमिकल, फूड अँड फ्रॅग्रन्स, तेल (ऑइल), प्लास्टिक आणि फार्मा अशा विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
उद्योगांमध्ये सुरक्षिततेची संस्कृती बळकट करणे, पर्यावरणीय कायदे व नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करणे आणि शाश्वत औद्योगिक पद्धती अमलात आणणे या क्षेत्रात त्यांनी प्रत्यक्ष योगदान दिले आहे. सुरक्षित कार्यस्थळे, कुशल मनुष्यबळ आणि जबाबदार संस्था निर्माण करण्यासाठी सुरक्षितता, कौशल्य विकास आणि जबाबदार कार्यपद्धती यांचे एकत्रीकरण करणे हा त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. लोक, प्रक्रिया आणि पर्यावरण यांच्या संरक्षणासाठी जनजागृती व मार्गदर्शन उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय योगदान देत आहेत.
एक अपघात ...अनेक किमती : लेख कसा वाटला या बद्दल आपले मत पुढील लिंक वरती क्लिक करून नोंदवा - Click


