पुणे : मुंढवा, पुणे येथील भारत फोर्ज लिमि. (Bharat Forge Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये वेतनवाढ करार दि.02 जुन 2026 रोजी संपन्न झाला.
करार मधील ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
करार कालावधी : वेतनवाढ करार 1 जुलै 2025 ते 30 जून 2028 (3वर्ष)
एकूण कामगार -1149
पगारवाढ : एकरकमी एक टप्पा प्रत्यक्ष रुपये -19000/- व अप्रत्यक्ष रुपये -1115/- एकूण - 20115/- रुपये एवढी एकरकमी भरगच्च वाढ दिली.
वाटप 40% बेसिक व 60%अलाउन्स व पी एफ वजा करण्यात येईल. तसेच नवीन wage code नुसार
Inclusion -65%, Exclusion -35% प्रमाणे वाटप करण्यात आले.
वेतनकरार फरकापोटी रु.198968 /- ( एक लाख आठ्यान्नव हजार नऊशे अडूसष्ठ रुपये )एवढी रक्कम देण्यात येईल. यातील रु.150000/- (एक लाख पन्नास हजार रुपये ) मे महिन्याच्या पगारात मिळतील. आणि उर्वरित रु. 48968/- पुढील पगारात मिळतील.
व्ही डि ए (बदलता महागाई भत्ता) : कंपनीच्या सेवेमध्ये असणारे कामगारांस पुणे राहणीमान निर्देशंकाच्या 5225 अंकाच्या वरील वाढीकरिता प्रतिदिन प्रतिअंकास 0.09 पैसे या दराने प्रचलित पद्धतीने बदलता महागाई भत्ता मिळण्यास पात्र राहतील.
सदर योजना.
-आय.आय.टी.मध्ये प्रवेश पात्र.
-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश पात्र
-AIIMS मधील वैद्यकीय शाखेत प्रवेश पात्र.
-महाराष्ट्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
-COEP, ICT, IISC, IISER प्रवेश पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
शिष्यवृत्ती योजना : उच्च शिक्षणासाठी नवीन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वार्षिक रु.700000/-(रु सात लाख) तरतूद करण्याचे मान्य केले आहे. सदर शिष्यवृत्ती इयत्ता सहावी ते पुढील शिक्षणा करित असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
उच्च शिक्षण कर्ज योजना : रु.140000/-(एक लाख चाळीस हजार) देण्यात येईल. सदर कर्ज बिनव्याजी असेल. सदर कर्जाची परतफेड 25 समान हप्त्यात करण्यात येईल. सदर कर्ज डिप्लोमा, डिग्री,पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिसिन/ इंजीनियरिंग, एमबीए, सीए, फार्मसी आणि इतर तंत्रशिक्षणासाठी देण्यात येईल
शैक्षणिक कर्ज योजना : शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत प्रतिवर्षी 30 कामगारांना 150000/- रुपये कर्ज 4% व्याजदराने मिळेल सदर रक्कम 48 हप्त्यात कपात करण्यात येईल. सदर योजना ही कामगारांच्या पाल्यांना कला, क्रीडा, शिक्षण आणि इतर गोष्टींच्या प्रोत्साहन पर बनविण्यात आली आहे.
उष्णता भत्ता : प्रत्यक्ष उष्णता भत्ता- प्रतिदिन रु.45/- देण्यात येईल. अप्रत्यक्ष उष्णता भत्ता- प्रतिदिन रु. 40/- देण्यात येईल.
रात्रपाळी भत्ता : रात्रपाळी भत्ता प्रतिदिन रु.45/- देण्यात येईल.
भोजन भत्ता : कॅन्टीन सुविधा घेऊ न शकणारा कामगारास भोजन भत्ता प्रतिदिन रु.400/- देण्यात येईल.
रविवारी काम केलेल्या दिवसासाठीचा भत्ता : जे कामगार रविवारी कामाला येतील त्या कामगारांना रविवारी काम केल्याबद्दल (मूळ पगार + महागाई भत्त्याच्या) 50% रक्कम रविवारचा भत्ता म्हणून मिळेल.
खातेनिहाय सहल भत्ता : खातेनिहाय सहल भत्ता प्रतिवर्ष रु.3000/- इतका देण्यात येईल.
मासिक हजेरीसाठी दोन दिवसाचा मूळ पगार +महागाई भत्ता एवढी रक्कम बक्षीस म्हणून प्रचलित पद्धतीने देण्यात येईल.
गृह /फर्निचर कर्ज योजना : ज्या कामगारांना सेवेत 8 वर्ष पूर्ण असतील असे प्रतिवर्ष 40 कामगार रु.350000/- ( तीन लाख पन्नास हजार) इतके कर्ज मिळण्यास पात्र असतील सदर कर्ज द.सा.द.शे 5% दराने देण्यात येईल. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी 70 महिन्यांचा असेल.
वाहन कर्ज योजना : ज्या कामगारांची 10 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. अशा 20 कामगारांना दर वर्षी 150000/- ( एक लाख पन्नास हजार रुपये) 4% वार्षिक व्याज दराने मिळतील. सदर कर्ज परतफेडीचा कालावधी 42 महिन्यांचा असेल.
लग्नासाठीची रजा : कामगारांना स्वतःच्या तसेच मुला-मुलीच्या लग्नासाठी भर पगारी 4 रजा देण्यात येईल. (जास्तीत जास्त 2 अपत्यांपर्यंत)
विवाहासाठी सहाय्य उचल : कामगाराला स्वतःच्या अथवा मुला, मुलीच्या लग्नासाठी रु. 175000/-(एक लाख पंच्याहत्तर हजार ) देण्यात येईल. सदर रकमेची परतफेड बिनव्याजी असेल. तसेच सदर परतफेड 50 हप्त्यांमध्ये करायची आहे.
1.आव्हाळवाडी कोलवडीसाठी रविवारी बस देण्यात येईल.
2. उरळीकांचन ची बस पुढे यवतपर्यंत वाढवण्यात आली आहे. (एका शिफ्ट साठी)
3. सासवड रूट ची विभागणी करून. सासवड ते भारत फोर्ज, आणि वडकी ते भारतफोर्ज अशा दोन वेगळ्या बस करण्यात येतील.
4. भोसरी बसचा रूट सुटसुटीत करण्यात येईल. बससुविधेपोटी दरमहा रु.100/-कपात करण्यात येईल.
खेळ : खेळांना उत्तेजन देण्यामध्ये आपण विशेषत्वाने उत्सुक आहे असे व्यवस्थापनाने मान्य केले असून दरवर्षी क्रिकेट,कब्बडी, व्हॉलीबॉल, सायकलिंग, कॅरम, बुद्धिबळ स्पर्धा भरविल्या जातील व येणारा सर्व खर्च कंपनीतर्फे केला जाईल, तसेच खेळाच्या व्यवस्थापनासाठी कमिटी बनवण्यात येईल आणि त्यात संघाचे प्रतिनिधी असतील. असे व्यवस्थापनेने मान्य केले आहे.
आरोग्य विमा योजना : आरोग्य विमा योजना यापुढेही चालू राहील.
फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी : कामगारांच्या कुटुंबासाठी(स्वतः कामगार, त्याची पत्नी, आई, वडील,दोन अपत्य) विमा रक्कम वार्षिक रु. 300000 /- (तीन लाख रुपये) असेल. या व्यतिरिक्त बफर पॉलिसी रुपये - 300000/-(तीन लाख रुपये) गंभीर आजारासाठी देण्याचे मान्य केले आहे.
आजारपणाची विशेष रजा : गंभीर आजारांसाठी आजारपणाची विशेष रजा 100 दिवस इतकी देण्यात येईल. कर्करोग,अर्धांगवायू,किडनी निकामी, जॉईंट रिप्लेसमेंट, टीबी, फुफुसाचे आजार, स्पाइन सर्जरी, लिगामेंट टीअर, ग्लुकोमा इ.गंभीर आजारासाठी वरील रजा मंजूर केल्या जातील. तसेच एखाद्या कामगाराची अँजिओप्लास्टी झाल्यास त्यास 65 दिवसांची विशेष आजारपणाची रजा मिळेल.
वैद्यकीय तपासणी : कामगारांची तसेच त्याच्या पत्नीची वेतनकराराच्या कालावधीत वैद्यकीय तपासणी केली जाईल. तसेच कामगाराची दरवर्षी वैद्यकीय तपासणी अध्यायावत हॉस्पिटल/लॅब मध्ये करण्याचे कंपनीने मान्य केले आहे.तसेच कामगाराचे चेकअप दरवर्षी NABL मान्यता लॅब द्वारे केले जाणार.
अपघात रजेचा लाभ : कंपनी आवारात अपघात झालेल्या कामगारांना पहिल्या दिवसापासून अपघात रजेचा लाभ मिळेल. कंपनी बाहेर अपघात झाला असल्यास जीपीए प्रमाणे अपघात रजेचा लाभ मिळेल.
1. महाराष्ट्राबाहेर - 18000/- रुपये प्रति महिना.
2. महाराष्ट्रात - 8000/- रुपये प्रति महिना
एल टी ए : प्रतिवर्ष रु.6000/- इतका प्रचलित पद्धतीने देण्यात येईल
घर बांधणी निधी : या निधीसाठी व्यवस्थापनाने एकरकमी रुपये 2000000/-(वीस लाख रुपये )देण्याचे मान्य केले आहे.
मरणोत्तर सहाय्य निधी : एखादा कायमस्वरूपी कामगार मृत पावल्यास कुटुंबीयांस मदत निधी म्हणून प्रत्येकी कामगार रुपये 450/- मदत देण्यात येईल आणि कामगारांची जी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम कंपनी देईल असे कंपनीने मान्य केले आहे.
कामगार कल्याण निधी : या निधीमध्ये प्रत्येक कामगाराचे 16 रुपये पगारातून कपात करून जमा करण्यात येतील तसेच तेवढीच रक्कम कंपनी देखील या निधीमध्ये जमा करेल.
* उपवासाच्या दिवशी म्हणजेच सोमवार, गुरुवार, शनिवार, चतुर्थी, महाशिवरात्री, आषाढी एकादशी या दिवशी देण्यात येणाऱ्या उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाणा लाडू देण्यात येईल.
* दररोज जेवणाबरोबर एक केळी देण्यात येईल.
* शुक्रवारी अंडाकरी मध्ये दोन अंडी मिळतील.
* छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी जेवणात स्पेशल मेनू असेल
ग्रॅच्युईटी : ग्रॅच्युइटी कायद्याप्रमाणे कामगारास दिली जाईल.
स्पेशल ग्रॅच्युइटी : दहा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ कंपनीची सेवा पूर्ण केलेल्या कामगारास कंपनी सोडल्यास किंवा सेवेतून बाहेर झाल्यास तो कामगार पाच महिन्यांचे वेतन (मुळ वेतन + महागाई भत्ता) स्पेशल ग्रॅच्युइटीस पात्र राहतील
1) 15 वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.3500/- देण्यात येईल.
2) 20 वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम 7500/- देण्यात येईल.
3) 25 वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.13500/-देण्यात येईल.
4) 35 वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.7000/-देण्यात येईल.
5) 38 वर्ष सेवा कालावधी पारितोषिक रक्कम रु.6000/-देण्यात येईल.
सेवानिवृत्ती वय : सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष असेल. सेवानिवृत्ती तारखे ऐवजी संबंधित महिन्याच्या अंतिम दिवशी सेवानिवृत्ती लागू केली जाईल.
सेवानिवृत्ती भेट : सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना एक महिन्याचे मूळ वेतन + महागाई भत्ता + 35000/-रुपये एवढी रक्कम सेवानिवृत्ती भेट म्हणून देण्यात येईल.
सांस्कृतिक महोत्सव : कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल व त्यासाठी येणारा सर्व खर्च कंपनीतर्फे केला जाईल. तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे व्यवस्थापन करण्यासाठी कमिटी बनवली जाईल आणि त्यात संघाचे प्रतिनिधी असतील असे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.
बोनस/ सानुग्रह अनुदान : बोनस/सानुग्रह अनुदान हे किमान वेतनाच्या 20% अंदाजे रु. 45000/- (पंचेचाळीस हजार रुपये ) प्रत्येक वर्षी देण्यात येईल.
मिठाई : कामगारांसाठी दसरा सणानिमित्त 1 किलो सुकामेवा/ मिठाई दरवर्षी देण्यात येईल. तसेच मिठाई ठरविण्यासाठी समिती करण्यात येईल आणि त्यात संघाचे प्रतिनिधी असतील.
कराराचा लाभ : कराराचा लाभ म्हणून रु.10000/- देण्यात येईल. तसेच या येणाऱ्या रकमेतून रु.5000/- इतकी रक्कम कंपनीने कापून घ्यावयाची असून ती रक्कम संघाच्या कार्यासाठी संघाकडे द्यावयाची आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने चेअरमन पद्मभूषण श्री. बाबासाहेब कल्याणी, माननिय व्हाइस चेअरमन श्री. अमित कल्याणी, तसेच सीनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि सी एच आर ओ श्री. श्रीनिवासू मल्लादी, व्हाईस प्रेसिडेंट एच आर आणि आय आर श्री. असीम जोशी यांचे आभार मानण्यात आले.
हा वेतनकरार फक्त पगारवाढ नाही, तर आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवण्याची हमी आहे, शिक्षणातून येणारी समद्धी घराघरात पोहोचेल आणि कामगारांचे राहणीमान उंचावेल यावर ठाम विश्वास यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आला.
सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच व कामगारांचा संघटनेवर असलेला अविश्वसनीय विश्वास यामुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनीही व्यक्त केली.


