पुणे : पिंपळे जगताप येथील जियांग्यिन युनि-पॉल व्हॅक्यूम कास्टिंग इंडिया प्रा.लि. (Jiangyin Uni-Pol Vacuum Casting India Pvt. Ltd.) कंपनीतील कामगारांचा गेली दोन वर्षे आपल्या न्याय्य मागण्याकरिता सनदशीर मार्गाने संघर्ष सुरू होता. त्या अडचणीच्या काळात कामगारांनी संघटनेप्रती दाखवलेला विश्वास, संयम तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीला अनुसरून संघटना व कामगारांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, संघटनेचे वकील श्री. नितीन कुलकर्णी साहेब यांनी संघटनेला दिलेले कायदेशीर सल्ले, ॲड. श्री. उमेश गोपाळे यांनी चौकशीत मांडलेले कामगारांची बाजू त्याचबरोबर शेवटी व्यवस्थापनाचे वकील श्री. अशोक गुप्ते यांची शिष्टाई व त्यास व्यवस्थापनाकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच सदरचा वेतन करार होऊ शकला आहे.
प्राप्त परिस्थिती विचारात घेऊन, व मान्यवर व्यक्तींच्या मतांचा आदर ठेवून, सदर वेतन कराराद्वारे व्यवस्थापन व कामगार यांचे सुलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊन कंपनी व कामगारांची प्रगती होईल या अपेक्षेने कामगारांची अपेक्षापूर्ती न होणारा वेतन करार संघटना व कामगारांनी स्वीकारून समजूतदारपणा दाखवला आहे.
सदरच्या वेतन करारावर दिनांक 30 मे 2026 रोजी स्वाक्षरी करण्यात आल्या, सदर करारातील लाभ खालील प्रमाणे.
1. संघर्षाच्या काळात गैरवर्तनाच्या कारणावरून एकूण सहा कामगारांना नोकरीतून बडतर्फ केले होते, सदर बडतर्फ कामगारांना त्यांच्या पूर्वीच्याच सेवाशर्ती वर त्यांना पुन्हा दिनांक 01 जून 2026 रोजी पासून नोकरी रुजू करून घेण्यात आले आहे.
2. आरोप पत्र देऊन चौकशी करिता निलंबित केलेल्या एकूण तीन कामगारांना त्यांचे निलंबन रद्द करून दिनांक 01 जून 2026 पासून कामावर रुजू करून घेतले आहे सदर प्रकरणी सदर कामगारांना शिक्षा म्हणून केवळ "ताकीद" पत्र देण्यात आले आहे.
3. एकूण नऊ कामगारांना आरोपपत्र, चौकशी सुरु किंवा काहींची चौकशी पूर्ण झाली होती. सदर नऊ कामगारांना "ताकीद" पत्र देऊन सदर प्रकरण कायमचे बंद करण्यात आले आहे.
4. गॅस तुटवडा कारणावरून व्यवस्थापनाने 10 दिवस कंपनीचे उत्पादन थांबविले होते, सदरच्या काळात कामगारांना वेतन न देता घरी बसविले होते त्याबाबत 05 दिवसांचे वेतन मे 2026 च्या पगारासोबत देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.
5. सन 2026 च्या दिवाळी सणाला कामगारांना रुपये 5000 चे गिफ्ट कुपन देण्याचे मान्य केले आहे.
6. पगारी सुट्टयांमधे 01 ने वाढ करून 11 करण्यात आल्या आहे.
7. सानुग्रह अनुदानः- बेसिक डी.ए च्या 10 ते 12 टक्के पर्यंत कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
8. पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी : वार्षिक 1200 रुपये प्रीमियम मधे बसणारी पॉलिसी लागू केली जाईल.
9. टर्म इन्शुरन्स पॉलिसीः वार्षिक 1200 रुपये प्रीमियम मधे बसणारे पॉलिसी कामगारांकरिता उतरवली जाईल.
10. मेडिक्लेम पॉलिसी सध्या रुपये वीस लाख प्रीमियम असणारी पॉलिसी कामगारांना लागू आहे. त्यामध्ये रुपये पाच लाख ने प्रीमियम वाढवून त्यामध्ये बसणारी मेडिक्लेम पॉलिसी कामगारांकरिता उतरवली जाईल.
11. 24 दिवसापर्यंत E.L. मिळण्याची तरतूद केली आहे.
12. संघर्षाच्या काळात व्यवस्थापन व संघटना यांनी एकमेका विरुद्ध विविध न्यायालयामध्ये दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याचे ठरले आहे.
13. व्यवस्थापन व संघटना यांच्या परस्पर संमतीने ठरविण्यात आलेली उत्पादकता कामगार देतील.
१) दिनांक 1 मे 2026 पासून पगार वाढ रुपये :- 11000
२) दिनांक 1 मे 2027 पासून पगार वाढ रुपये :- 5000
३) दिनांक 1 मे 2028 पासून पगार वाढ रुपये :- 3500
४) दिनांक 1 मे 2029 पासून पगार वाढ रुपये :- 3000
५) इन्सेंटिव्ह पेमेंट मधे वाढीव तरतूद रुपये :- 1500
एकूण पगारवाढ रुपये :- 24000/-
सदर वेतन करारावर कंपनीच्या वतीने कंपनीचे जनरल मॅनेजर श्री. ओंकार कुलकर्णी, सिनियर मॅनेजर एच.आर. श्री.अशोक चव्हाण, डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. गुलाब ठाकरे, सिनियर मॅनेजर क्वॉलिटी विभाग श्री.अभिजीत सोनवणे, कंपनी सेक्रेटरी सौ. गौरी दिघवा व असिस्टंट मॅनेजर एच.आर श्री. प्रशांत माळी यांनी स्वाक्षरी केल्या.
तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष, श्री. शरद लोंढे, जनरल सेक्रेटरी श्री दत्तात्रय निळूगडे, उपाध्यक्ष श्री. माधव फरांदे, सह. जनरल सेक्रेटरी श्री. निलेश सुर्वे, खजिनदार श्री. दिपक ताठे व सह. खजिनदार श्री. आण्णा व्हटकर यांनी स्वाक्षरी केल्या.
कठीण व प्रतिकूल काळात साथ देणारे सर्व कामगार, श्रमिक एकता महासंघाचे सर्व पदाधिकारी, संघटनेचे वकील श्री. नितीन कुलकर्णी व श्री. उमेश गोपाळे, श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार श्री. मारुतीराव जगदाळे व श्री. दिलीप पवार तसेच करार यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण शिष्टाई केलेले कंपनीचे वकील श्री. अशोक गुप्ते व त्यास सकारात्मक प्रतिसाद देणारे व्यवस्थापन या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
अशाप्रकारे कंपनीच्या बोर्डाचे व युनियनच्या बोर्डचे व्यवस्थापन आणि कामगार यांचे हस्ते पूजन करून, DJ च्या जल्लोषात व गुलालाच्या उधळणीत धूम धडाक्यात कराराचे स्वागत करून कामगारांनी आनंद व्यक्त केला अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.


