पुणे : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एव्हरी डेनिसन इंडिया प्रा. लि.(Avery Dennison Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि एव्हरी डेनिसन एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये गुरुवार दिनांक १४/०५/२०२६ रोजी आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात वेतनकरार संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
एकूण पगारवाढ : रु.२६,६८५/- ( फिक्स - रु.२४,३८४ + २३०१ व्हेरियबल)
पहिल्या वर्षी :- ४०%
दुसऱ्या वर्षी :- ३०%
तिसऱ्या वर्षी :- २०%
चौथ्या वर्षी :- १०%
कराराचा कालावधी : दि.०१/०४/२०२६ ते ३१/५/२०३० असा ४.२ वर्षे म्हणजेच ५० महिने राहील.
मेडिक्लेम पॉलीसी : कुटुंबासाठी ५,००,०००/- रुपये पूर्वी प्रमाणे राहील.
अपघाती मृत्यू योजना (GPA) : एखाद्या कामगाराचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाल्यास लागू असलेली कॉर्पोरेट पॉलिसी पूर्वी प्रमाणे सुरु राहील.
₹१५ लाख किंवा तीन CTC यापैकी जी रक्कम अधिक असेल ती देण्यात येईल. (अपघाती मृत्यू मध्ये GPA व GTL दोन्हीचे लाभ मिळतील )
(₹१५ लाख किंवा तीन CTC यापैकी जी रक्कम अधिक असेल ती देण्यात येईल.)
नवीन करारनुसार ८+१ = ९ करण्यात आली.
EL - २३
SL - १०
पूर्वी प्रमाणे राहील.
सांत्वन रजा : स्वतः किंवा पत्नीच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे निधन झाल्यास पूर्वीप्रमाणे ३ दिवस सांत्वन रजा देण्यात येईल.
पितृत्व रजा : पूर्वीप्रमाणे प्रत्येकाला दोन अपत्य करिता ५ दिवस रजा देण्यात येईल. सदर रजा दत्तक अपत्य करिता लागू राहील.
वाढदिवस रजा : स्वतःच्या वाढदिवसाला प्रत्येक वर्षी एक दिवस रजा पूर्वीप्रमाणे देण्यात येईल.
राष्ट्रीय सुट्या : वार्षिक १० दिवस पूर्वीप्रमाणे देण्यात येईल.
त्यानंतर च्या सुटीचे ग्रॉस पगारानुसार रोखीकरण करण्यात येईल.
वाहतूक सुविधा : बस वाहतूक सुविधा पूर्वी प्रमाणे सुरु राहील.
दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस पूर्वीच्या प्रथेनुसार देण्यात येईल.
खेळ :दरवर्षी एक इनडोर व एक आऊटडोर अशा दोन स्पर्धा आयोजित करण्यात येईल. आऊटडोर स्पर्धा ही साप्ताहिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील.
गणवेश : गणवेश पूर्वीप्रमाणे ४ शर्ट व २ पॅन्ट मिळेल .
जॅकेट /स्वेटर : पूर्वीच्या प्रथेनुसार प्रत्येकाला दोन वर्षाकारिता ₹१४०० पर्यंत जॅकेट दिले जाईल.
रात्रपाळी भत्ता : पूर्वीप्रमाणे प्रति रात्रपाळी ₹२००/- देण्यात येईल.
विशेष आजार सुट्टी : एखादी दीर्घकालीन आजारी रजा व्यवस्थापनासोबत चर्चा करून मान्य करण्यात येईल सदर प्रकरणात व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम राहील.
दिवाळी गिफ्ट : पूर्वीप्रमाणे रु.१००००/- या रकमेचे गिफ्ट कार्ड देण्यात येईल.
संघटना सोयी /सवलती : संघटनेला देण्यात येणाऱ्या सोयी सवलती पूर्वीप्रमाणे सुरु राहिल.
५ वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना ७०००/- रुपये
१० वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना १२०००/- रुपये
१५ वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना २००००/- रुपये
२०*वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना २५०००/- रुपये
२५ वर्षे सर्विस झालेल्या कामगारांना ३००००/- रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल.
करार करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने श्री.अनिस शेख (IR हेड, साऊथ आशिया), श्री.स्मिथ कुलथिंगल (प्लांट .हेड), श्री.नीलेश वाबळे (मेंटेनन्स मॅनेजर), श्री.अभिमन्यू ढवळे (इन्व्हेंट्री मॅनेजर ) श्री.मनतेश नाईक पाटील (ऍडमिन मॅनेजर), श्री.केदार रक्तकंठवार (क्वालिटी मॅनेजर), श्री शेहजादा सलीम (असि. मॅनेजर), कु. यशस्विनी ठाकूर (असि. मॅनेजर) आणि संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री. रणजित गायकवाड , उपाध्यक्ष श्री जितेंद्र निळूगडे, उपाध्यक्ष श्री उदय वाघ, ज.सेक्रेटरी श्री. मंगेश मेटकर, जॉ.सेक्रेटरी श्री महेश फेगडे, जॉ.सेक्रेटरी श्री राजेंद्र दिवेकर, खजिनदार श्री.नागेश कदम, सदस्य श्री.प्रवीण पटेकर, सदस्य श्री.रवींद्र शेलार यांनी सह्या करून वेतनकरार संपन्न झाल्याचे जाहीर केले.
सदर करारदरम्यान श्रमिक एकता संघांचे पदाधिकारी श्री किशोर सोमवंशी , श्री रोहित पवार तसेच सल्लागार श्री अरविंद शोत्री, श्री मारुती जगदाळे, श्री दिलीप पवार तसेच सर्व आजी माजी प्रतिनिधी व कामगार बंधुचे सहकार्य लाभले त्यामुळेच हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला अशी माहिती युनियन यांच्या वतीने देण्यात आली.

