एन आय पी एम ची दोन दिवसीय विभागीय कार्यशाळा संपन्न

पुणे : एन आय पी एम या मनुष्यबळ विकास क्षेत्रात काम करणाऱ्या शिखर संस्थेची पुणे येथे महाराष्ट्र गोवा गुजरात राज्यासाठीची विभागीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेसाठी राज्यातील प्रमुख शहरांमधून 55 होऊन अधिक मनुष्यबळ विकास क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी उपस्थिती नोंदवली.

या कार्यक्रमास डॉक्टर संतोष भावे माजी मनुष्यबळ विभाग संचालक भारत फोर्ज, श्री विश्वेश कुलकर्णी चेअरमन यशस्वी ग्रुप व माजी राष्ट्रीय अध्यक्ष एन आय पी एम यांनी विशेष मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळेला संबोधित करताना पी आर बसवराजु राष्ट्रीय अध्यक्ष यांनी येत्या काळामध्ये संघटनेच्या एकूण ध्येयधोरणाबद्दल व विस्तारा बद्दल सविस्तर माहिती दिली. 

या कार्यशाळे दरम्यान अहिल्यानगर या नवीन चाप्टरला मान्यता प्रदान करण्यात आली असून मनुष्यबळ विकास क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी व्यक्तींनी संस्थेचे अजीवन सभासदत्व घ्यावे असे आव्हान केले आहे.

 ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री अभय खुरसाळे पश्चिम विभाग राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, डॉक्टर नरेंद्र पाटील पश्चिम विभाग उपाध्यक्ष तसेच पुणे चॅप्टरचे अध्यक्ष श्री कल्याण पवार व चॅप्टर चे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.