कामगार क्षेत्राच्या काल, आज व उद्यावर मान्यवरांचे मंथन
पिंपरी-चिंचवड : कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने "कामगार क्षेत्र : काल, आज आणि उद्या" या विषयावर आयोजित चर्चासत्रात कामगार चळवळीतील योगदानाबद्दल कामगार नेते मा. भरत शिंदे यांना 'कामगार रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
शनिवार दि. 23 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वा. रोटरी क्लब हॉल, पेट्रोल पंपाजवळ, संभाजीनगर, चिंचवड, पुणे - 19 येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस होते. कार्यक्रमाचे संयोजन कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले.
यावेळी 'कामगार नेतृत्वाची भूमिका' या सत्रात मा. इरफान सय्यद, अध्यक्ष महाराष्ट्र मजदूर संघ, मा. रघुनाथ कुचिक, मा. अध्यक्ष किमान वेतन सल्लागार समिती, मा. क्रांतीकुमार कडुलकर, मा. मानव कांबळे, ज्येष्ठ नेते व मा. सचिन लांडगे, कामगार नेते यांनी सहभाग घेतला.
'माध्यम प्रतिनिधींची भूमिका' या सत्रात दै. सकाळचे मा. जयंत जाधव, दै. केसरीचे मा. नंदकुमार सातुर्डेकर, पी.सी.एम.सी. न्यूजचे मा. विजय जगताप व किमया कम्युनिकेशनचे मा. जयंत शिंदे यांनी कामगारांच्या प्रश्नांना माध्यमांनी कशी वाचा फोडावी यावर विचार मांडले. कामगार व्यवस्थापन समन्वय मा. राजेंद्र घावटे यांनी केला.
पुरस्काराबद्दल :
कामगार नेते मा. भरत शिंदे हे फोर्स मोटर्स आकुर्डी येथे कार्यरत आहेत. ते अनेक संघटना ना मागदर्शन करतात तसेच विविध संघटनाचे सल्लागार म्हणून काम पाहतात.
ते इंडस्ट्रियल कोर्ट किंवा लेबर कोर्टात स्वतः केस लढतात. त्यांनी गेली 25 -30 वर्षे कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा व सुरक्षित कामाच्या ठिकाणासाठी दिलेल्या लढ्याची दखल घेऊन कष्टकरी संघर्ष महासंघाने त्यांना 'कामगार रत्न पुरस्कार' जाहीर केला. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या आधी पण त्यांना विविध संस्थेकडून कामगार पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
सत्काराला उत्तर देताना भरत शिंदे म्हणाले, "हा पुरस्कार माझा नसून हजारो कष्टकरी कामगारांच्या संघर्षाचा सन्मान आहे. बदलत्या काळात कामगारांचे प्रश्न अधिक जटिल होत आहेत. संघटित होऊनच आपण भविष्य घडवू शकतो."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धनाथ देशमुख यांनी केले. यावेळी युवराज नीलवर्ण, राजेश माने, तुषार घाडुळे, अनिल बारवकर, इरफान चौधरी, लाला राठोड, बालाजी लोखंडे, सहदेव होनमाने, सुनिल भोसले, सखाराम केदार आदी निमंत्रक व मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.
