महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांनी दि.१७.०२.२०२६ रोजी राज्य कामगार आयुक्त,मुंबई यांना पत्र देऊन दि.४.१२.२०२५ रोजी ठाणे औद्योगिक न्यायलायने २२८५ वीज कंत्राटी कामगार यांना कायम करावे असा जो अवॉर्ड घोषित केला होता. मात्र कोर्टाच्या आदेशानुसार महावितरण कंपनी प्रशासनाने याची अंमलबलावणी न केल्याबाबत महावितरण वीज कंपनी प्रशासना विरुध्द तक्रार व कारवाईची मागणी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात व प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली होती.
दि.४.१२.२०२५ रोजी ठाणे औद्योगिक न्यायलायने आदेश देऊन देखील महावितरणने अंमलबजावणी न झाल्याने कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे .
या तक्रारीची दखल घेऊन लक्ष्मण भुजबळ ( कामगार उप आयुक्त, औ.सं, मुंबई. ) यांनी सोमवार दि ०६.०४.२०२६ रोजी, दुपारी ०३.३० वाजता ४ था मजला, समिती कक्ष, कामगार भवन, ई ब्लॉक, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक महावितरण व संघटनेच्या पदाधिकारी यांना दि.१ एप्रिल रोजी पत्र देऊन बैठीस उपस्थित राहण्याचे बाबतीत सुचना केली आहे.
लवकरच यात तोडगा निघून २२८५ वीज कंत्राटी कामगारांना कायम दर्जा व वेतनाचा सर्व फरक मिळेल अशी आशा भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमने यांनी व्यक्त केली आहे. या मिटींग करिता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ पदाधिकाऱी उपस्थित राहणार आहेत अशी माहीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले आहे.
