चाकण : सध्या चाकण औद्योगिक परिसरामध्ये एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे अनेक कामगारांना अन्न बनविण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, संवेदना फाउंडेशन संस्थेमार्फत “अन्न सेवा अभियान” सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे या कठीण काळात कोणताही कामगार उपाशी राहू नये हा आहे.
या अंतर्गत, सिग्मा चौक, महाळुंगे, चाकण MIDC येथे दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत अत्यल्प दरात (फक्त रुपये २५) पौष्टिक अन्न उपलब्ध करून दिले जात आहे. हा उपक्रम “ना नफा, ना तोटा” या तत्वावर चालविण्यात येत असून याचा लाभ अनेक कामगारवर्ग घेत आहे.
